कालीका यात्रोत्सवासाठी पोलिस यंत्रणा सज्ज

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नाशिकः नाशिकचे प्राचीन ग्रामदैवत श्री कालिका देवी यात्रोत्सव दरवर्षीप्रमाणेच यंदाही सुरळीत पार पाडण्याचा निर्धार आज झालेल्या बैठकीतून करण्यात आला. बैठकीत पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी काही उपयुक्त सुचना केल्या. 

जुन्या मुंबई महामार्गावर श्री कालिका देवीचे प्राचीन मंदिर असून याठिकाणी दरवर्षी नवरात्रोत्सवात मोठी यात्रा भरते. नऊ दिवसात तसेच दसऱ्याच्या दिवशी लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात. त्यापार्श्‍वभूमीवर आज ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील यांनी आज सकाळी मंदिराच्या आवारात नियोजन बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीला पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांच्यासह भद्रकाली, मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक, महापालिकेचे अधिकारी, वीज मंडळाचे अधिकारी व देवस्थानचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी संस्थानचे अध्यक्ष पाटील यांनी यात्रोत्सवात महिला व पुरूषांसाठी स्वतंत्र दर्शन रांगा करण्यात येणार असून अडचणीच्या काळासाठी आपत्कालिन मार्गाची निश्‍चिती करण्यात आल्याचे सांगितले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news kalika yatra