सीसीआयपेक्षा खेडा पध्दतीने खरेदी वाढली; शेतकर्‍याच्या घरात कापूस नसल्याने वाढताहेत भाव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सीसीआयपेक्षा खेडा पध्दतीने खरेदी वाढली; शेतकर्‍याच्या घरात कापूस नसल्याने वाढताहेत भाव

सीसीआय केंद्रापर्यंत कापूस पोहचविण्यासाठी प्रती क्विंटल किमान दोनशे खर्च होत आहेत.हा भाव शेतकर्‍यांना परवडत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सीसीआयपेक्षा खेडा पध्दतीने खरेदी वाढली; शेतकर्‍याच्या घरात कापूस नसल्याने वाढताहेत भाव

कापडणे : सीसीआयकडून कापूस खरेदी करतांना प्रतवारी केली जात आहे. पाच हजार पाचशेपेक्षा कमी दराने खरेदी होत आहे. तर खुल्या बाजारात कापसाचे दर पाच हजार सहाशे ते सहा हजारपर्यंत पोहचले आहेत. सीसीआयपेक्षा खेडा पध्दतीने खरेदी वाढली आहे. आता शेतकर्‍याच्या घरात कापूस नसल्यानेच भाव वाढत आहे. व्यापार्‍यांचाच फायदा आहे. शेतकर्‍यांच्या घरात कापूस असतांना भाव वाढत नसल्याचे शेतकर्‍यांमधून संताप व्यक्त होत आहे.

आवश्य वाचा- Breaking : नंदुरबारमध्ये जीप दरीत कोसळली; सहा मजुरांचा जागीच मृत्यू
 

सीसीआय करतेय प्रतवारी 
सीसीआयकडून कापसाची खरेदी होत आहे. दर निश्चितीपेक्षा कमी भावाने खरेदी सुरु आहे. प्रतवारी होत असल्याने भाव कमी झाले आहेत. सरासरी प्रती क्विंटल पाच हजार पाचशेपेक्षा कमी भाव आकारला जात आहे. सीसीआय केंद्रापर्यंत कापूस पोहचविण्यासाठी प्रती क्विंटल किमान दोनशे खर्च होत आहेत.हा भाव शेतकर्‍यांना परवडत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. 

खेडा पध्दतीने कापूस खरेदी
खुल्या बाजारात कापसाचे दर पाच हजार सहाशे ते सहा हजारपर्यंत पोहचले आहेत. खेडा पध्दतीला सुगीचे दिवस आले आहेत. मोठ्या शेतकर्‍यांना आर्थिक अडचण नसल्याने भरुन ठेवलेला कापूस विक्री केला जात आहे. दुसरीकडे व्यापार्‍यांनीही भरुन ठेवलेल्या कापसामुळे ते तेजीत आले आहे. 

आवर्जून वाचा- कापूस खरेदीतील टोकन घोटाळा भोवला; बाजार समिती सचिव निलंबित 


 
खेडा पध्दतीत अधिक भावाने कापूस खरेदी होत आहे. पण आज शेतकर्‍याच्या घरात कापूस नाही. भाववाढीचा लाभ कोणाला होत आहे. हे सर्वज्ञात आहे. भाव निश्चिती असतांना कमी भावाने खरेदी व्हायलाच नको.
- आत्माराम पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शेतकरी संघटना

 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top