
यावर्षी पावसाने धो धो तीन महिने सलग हजेरी लावली आहे. विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी विक्रमी आहे. परीसरातील शेतकर्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र विक्रमी वाढविले आहे.
कापडणे : महिनाभरापूर्वी मेथी आणि कोथींबीर बर्यापैकी भाव खात होती. काही शेतकर्यांनी काही प्रमाणात कमाईही केली. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मेथी आणि कोथींबीरीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अक्षरशः हा काढलेला भाजीपाला बाजारातच फेकून द्यावा लागला. आता तर शेतकर्यांनी मेथी व कोथींबीरीवर रोटाव्हेटर फिरविला आहे. रिकाम्या क्षेत्रात गहू व हरभर्याची पेरणी सुरु केली आहे. मेथी कोथींबीरीची हिरवाई उतरली आहे.
वाचा- न थांबता ५८० मीटर अंतर ३२ मिनिटांत पोहून पार
मेथी कोथींबीर प्रती किलो सहा
यावर्षी पावसाने धो धो तीन महिने सलग हजेरी लावली आहे. विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी विक्रमी आहे. परीसरातील शेतकर्यांनी भाजीपाल्याचे क्षेत्र विक्रमी वाढविले आहे. त्यातच सुरत, धुळे व शहाद्याच्या बाजारात मेथी, कोथींबीर आणि पालकची आवक शंभर टनपेक्षा अधिक गेली आहे. यामुळे भाव उतरलेत. प्रती किलो सहापेक्षा कमी दर मिळत आहे. काढणीचाही खर्च निघत नसल्याने शेतकर्यांनी या भाजीपाल्यावर रोटाव्हेटर फिरविण्यास सुरूवात केली आहे.
भाजीपाला स्वस्त
टोमॅटो, मुळा, पालक, भेंडी, गवार, दोडके आदी भाजीपालाही प्रती वीस किलोच्या आतच विक्री होत आहे. पण मिरचीने चाळीशी पार केली आहे. आगामी काही दिवसांत मिरचीचा अधिक भाव वाढणार असल्याचे व्यापार्यांकडूनच सांगितले जात आहे.
आवश्य वाचा- अरेच्चा : 92 वर्षाचे धनुकाका बनले तरुणांचे 'आयकाँन'
मेथी व कोथींबीर काढणीचा प्रती किलो दोन, वाहतूकीचा प्रती किलो अडीच आणि इतर खर्च प्रती किलो दीड आहे. म्हणजे प्रती किलो सहा खर्च केल्यानंतरच हा भाजीपाला बाजारात पोहचतो. भावच सहाच्या आत मिळत आहे. परवडत नसल्याने रोटाव्हेटर फिरविला आहे.
प्रल्हाद विकास पाटील, युवा शेतकरी कापडणे.
संपादन- भूषण श्रीखंडे