esakal | धुळे जिल्ह्यातील ६० शाळांची नववर्षात वाजली घंटा 
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे जिल्ह्यातील ६० शाळांची नववर्षात वाजली घंटा 

धुळे तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील चौदा शाळाही तीन आठवड्यानंतर सुरु झाल्या आहेत.

धुळे जिल्ह्यातील ६० शाळांची नववर्षात वाजली घंटा 

sakal_logo
By
जगन्नाथ पाटील

कापडणे : धुळे जिल्ह्यातील साठ माध्यमिक विद्यालयांची पहिली घंटा आज नववर्षाच्या पहिल्या दिनीच वाजली.आठ डिसेंबरपासून दोनशे सदतीस शाळा सुरु झाल्या आहेत. टप्याटप्याने सर्वच शाळा सुरु करण्यासाठी जिल्ह्यात पोषक वातावरण तयार झाल्याने पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

धुळे तालुक्यातील प्रतिबंधित क्षेत्रातील चौदा शाळाही तीन आठवड्यानंतर सुरु झाल्या आहेत. तीनशेपेक्षा अधिक विद्यार्थी संख्या असलेल्या १७४ शाळाही टप्याटप्याने सुरु सुरु होत आहेत. 

धुळे तालुक्यातील कापडणे, उडाणे, सोनगीर, मोराणे, नेर, नगाव, लोहगड, मोरदड, लोणखेडी, विंचूर, कुसूंबा, फागणे, आर्वी, वेल्हाणे व महिंदळे ही गावे प्रतिबंधित क्षेत्रात होती. आता येथील शाळा आजपासून सुरु झाल्यात. दरम्यान येथील एच. एस. बोरसे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाला केंद्रप्रमुख हेमलता पाटील यांनी भेट दिली. उपाययोजनांची पाहणी केली. 

शाळा उघडण्याच्या तारखा अशा :

वेल्हाणे- ३१ डिसेंबर, न्याहळोद- २ जानेवारी, बोरीस, लामकानी- ५जानेवारी, मुकटी- ६ जानेवारी, कुसुंबा, गरताड- १० जानेवारी 
 

आजपासून सुरु झालेल्या शाळा 
धुळे- ३१ 
साक्री- १८ 
शिंदखेडा- ११