कपालेश्वर मंदीराचा दगड निखळला,दुर्घटना टळली 

live
live

नाशिक ः पंचवटीतील कपालेश्‍वर मंदीराच्या प्रदक्षिणा मार्गावर आज दुपारी बाराच्या सुमारास मागच्या बाजूला दगड निखळून पडला. मात्र काही सेकंदाच्या फरकाने त्या भागातून भाविक पुढे गेलेला असल्याने दुर्घटना टळली. श्रावण महिण्यात दर्शनाला गर्दी वाढत असतांना मंदीराचे दगड निखळण्याच्या घटनामुळे भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. 

पंचवटीत कपालेश्‍वर मंदीरात श्रावण महिणा असल्याने दर्शनाला मोठी गर्दी सुरु झाली आहे. सोमवारपासून त्यात आणखी वाढ होणार आहे. दर शनिवारी रात्री दहाला मंदीरात आरतीला मोठी गर्दी असते. अशा कायम वर्दळ असलेल्या कपालेश्‍वर मंदीरात आज दुपारी बाराच्या सुमारास मंदीराच्या मागच्या बाजूला प्रदक्षिणा मार्गावर मंदीराच्या वरच्या भागाचा दगड निखळून पडला. तत्पूर्वी काही सेकंद आधी प्रदक्षिणा मारणारे भाविक पुढे गेला तर काही जण मागे होते. दगड निखळून पडताच मागील भाविक मागेच थबकले, त्यामुळे दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने त्या भागात बॅरेकेडस लावण्यात आले. पण यानिमित्ताने ऐन श्रावणाच्या गर्दीत भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्‍न मात्र ऐरणीवर आला आहे. 

पुरातन मंदीराची ख्याती 
     कपालेश्‍वर हे पुरातन मंदीर आहे. पूर्ण दगडाचे बांधकाम असलेल्या या मंदीराची ख्याती मोठी आहे. कि टू नाशिक-त्र्यंबक 1941-42 या पुस्तकातल्या उल्लेखानुसार इ.स. 1100 मध्ये स्थानिकांच्या विनंतीवरून गवळी राजाने जमिनी विकत घेऊन 5000 रुपये खर्च करून श्री कपालेश्वर मंदिर बांधून संस्थानला अर्पण केले. त्यानंतर. 1738 मध्ये कोळी राजा नाशिक मुक्कामी असतांना उर्वरित मंदिर बांधून दिले. कोळी राजाने मंदिरातील पूजाविधीसाठी शैव-गुरवांची नेमणूक केली. 1763 मध्ये मंदिरातील पायऱ्या कृष्णाजी पाटील-पवार यांनी बांधून दिल्या. मूळ सभामंडप जगजीवनराव पवारांनी 1763 मध्ये बांधून दिला होता. त्यानंतर कपालेश्वर मंदिर आणि सभामंडप जीर्ण झाल्यामुळे शेठ खिमजी आसर व इतरांनी 20 हजार खर्च करून 1902 मध्ये मंदिराच्या जीर्णोद्धार करून मंदिर विश्वस्तांना सुपूर्द केले. 

ब्रेकर हादऱ्यांचा परिणाम 
दोन वर्षापूर्वी वॉटर प्रुफींगचे कामकाज करण्यात आले होते. मंदीराच्या डागडूजीचे कामकाज करतांना त्यात ब्रेकरसारख्या मशीनचा वापर झाल्यामुळे हादरे बसून दगड कमकुवत झाल्याची तक्रार आहे. श्रावण महिण्यात सोमवारी पहाटेपासून मंदीरात दर्शनासाठी व रुद्राभिषेकाला गर्दी असते. दूरदूरहून भाविक येत असतात.रामकुंडावर धार्मिक विधीसाठी विविध भागातून येणाऱ्या भाविकांचा राबता असतो. दर्शनानंतर मंदीराला प्रदक्षिणा करतांना मागच्या बाजूला डोक टेकवता त्या ठिकाणी काही सेकंदाचा फरकाने दगड पडल्याची घटना घडल्याने पावसाळ्यात काळजी घेण्यासाठी बॅरेकेडस लावल्या असल्या तरी, श्रावणातील दररोजची श्रावणातील गर्दीचया काळात हजारो भाविक येतात. त्यांच्या काळजी घेण्याची मागणी सुरु झाली आहे. 


वर्षापूर्वी मंदीराच्या कामकाजा दरम्यान रस्ते फोडण्यासाठी वापरले जाणारे ब्रेकर वापरले गेले. वॉटर प्रुफींगची कामे मजूरांनी करण्याऐवजी मशीनने करतांना प्रचंड हादरे बसत त्यामुळे तेव्हाच त्याविषयी हरकत नोंदविली होती. मात्र हरकतीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच अशा दुर्घटनांना आमंत्रण मिळत आहे. 
-देवांग जानी (स्थानिक रहिवाशी) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com