खानदेश-सुरतची नाड जोडणारी जिवनवाहिनी बंदमूळे लाखोंची उलाढाल ठप्प 

खानदेश-सुरतची नाड जोडणारी जिवनवाहिनी बंदमूळे लाखोंची उलाढाल ठप्प 

कापडणे : खानदेशातील खेड्यापाड्यातील माणसांचे सुरतशी अतुट असे नाते आहे. वर्षोनुवर्षे पडलेल्या दुष्काळामुळे पिळलेल्या खानदेशीला हमखास रोजगार देणारे शहर म्हणजे सुरत होय. लाॅक डाऊनमुळे रेल्वेने हजारोंचा प्रवास थांबला आहे.

गोरगरीबांना रेल्वेचा प्रवास परवडणारा आहे. भुसावळ ते सुरत दरम्यान प्रत्येक थांब्यावर थांबणार्‍या तेरा रेल्वे सहा महिन्यांपासून बंद असल्याने खानदेश आणि गुजरातची नाड तुटली आहे. शेकडो व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत. रेल्वे स्थानकांवरील लाखोची उलाढाल थप्प झाली आहे. आता रेल्वेची चाके सुरु झाल्यास, पुन्हा नाड जुळण्यास गती आणि व्यावसायिक चाके फिरण्यास मदत होणार आहे.

खानदेश सुरतची नाड जोडणार्‍या जिवनवाहिन्या

सुरत ते अमरावती, पाळधी ते उधाना मेमो, उधाणा ते नंदुरबार, सुरत ते भुसावळ पॅसेंजर, ताप्ती गंगा, नवजिवन एक्सप्रेस, भुसावळ ते सुरत बांद्रा, ओखापूरी एक्सप्रेस, अजमेर पुरी श्रमिक एक्सप्रेस, भागलपूर ते सुरत, सुरत ते दानापूर, गोरखपूर एक्सप्रेस या तेरा रेल्वे खानदेश आणि सुरतची खेडोपाड्यांच्या नाड जुळविणार्‍या जिवनदायिनी आहेत. या सर्व सहा महिन्यांपासून बंद आहेत.

या रेल्वे सुरु पण...?
हावडा ते कोविड वन सुपर फास्ट  स्पेशल (सोमवार), ताप्ती गंगा कोविड वनस्पेशल (रविवार, सोमवार, बुधवार, गुरुवार शुक्रवार), संतरागाची विशेष भाडे  रेल्वे (रविवार सोमवार गुरुवार शनिवार), द्वारका कोविड 19 स्पेशल (सोमवार) व खुर्दारोड अहमदाबाद कोवीड 19 सुपर फास्ट एक्सप्रेस या पाच विशेष रेल्वे सुरु झाल्या आहेत. पण भुसावळ, जळगाव, अमळनेर, दोंडाईचा, नंदुरबार व नवापूर हे वगळता सव्वीस लहान थांबे घेत नसल्याने यांचा खानदेशीयांना उपयोग झालेला नाही.


तीस थांब्यावरील व्यवसायिक बेरोजगार

खानदेशातील भुसावळ, तरसोद, जळगाव, पाळधी, चावलखेडा, धरणगाव, भोण, टाकरखेडा, अमळनेर, भोरटेक, पाडस, बेटावद, नरडाना, होळ, शिंदखेडा, सोनशेलू, विखरण, दोंडाईचा, रनाळा, तिखी, चौपळे, नंदुरबार, ढेकवद, भादवड, खांडबारा, खातगाव, चिचपाडा, कोडद, नवापूर, भडभुंजा या तीस थांब्यावरील विविध व्यावसायिक बेरोजगार झाले आहेत.

दररोज मजूरांची गैरसोय  
नवापूर व नंदुरबार तालुक्यातून शेकडो बिगारी व हात मजूरी करणारे रेल्वेने अप डाऊन करतात. त्यांची रेल्वेने अल्प भाड्यात सोय होते. त्यांची मोठी गैरसोय झाली. स्थानिक रोजगार नसल्याने रोजगारासाठी भटकंती करावी लागत आहे.     

आवर्जून वाचा- रहस्‍यमय..जंगलातील धबधब्‍यावर गेले; युवक अचानक झाला गायब*
 
शेकडो व्यावसायिक बेरोजगार
लहान मोठ्या सव्वीस थांब्यावर विविध व्यवसाय करणारे सहा महिन्यांपासून बेरोजगार झाले आहेत. दररोजची लाखोंची उलाढाल ठप्प झाली आहे.

दरम्यान खानदेशातील हजारो कुटूंबे सुरतमध्ये स्थिरस्थावर झाले आहेत. सहा महिन्यांपासून गा खानदेश आणि सुरतची नाड जोडणार्‍या सर्वच रेल्वे सुरु करण्याची मागणी सुरु झाली आहे.  

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com