कसारा घाटात गॅस टँकरला आग

live
live

इगतपुरी शहर -मुंबई आग्रा महामार्गावरील कसारा घाटात बुधवारी गॅस टँकरला अचानक आग लागल्यामुळे काही काळासाठी मुंबईहुन नाशिककडे जाणारा महामार्ग बंद करण्यात आला होता.
  दुपारी तीन वाजे दरम्यान मुंबईहुन नाशिककडे येणाऱ्या जुन्या कसारा घाटातील टोप बावडी जवळ हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅस टँकरच्या ड्रायवहर कॅबिनला अति उष्णतेमुळे व शॉटसर्कीटमुळे आग लागली. या घटनेची माहीती समजताचं घोटी टोलप्लाझा वरील पिंक इन्फ्रा व इगतपुरी नगर पालिका अग्निशमन पथकाचे नागेश जाधव, फ़िरोज पवार, प्रमोद भटाटे, पिक इन्फ्राचे पेट्रोलिंग टीमचे सुरज आव्हाड, राहुल पुरोहित, अनिल ठाकुर, उमेर शेख, रवी दुर्गुडे, महेश घोटकर, दिपक उघडे, सचिन मागे, वसीम शेख, सचिन भडांगे व महामार्ग सुरक्षा पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली.
मात्र या आगीत टँकरची कॅबिन पुर्णपणे जळुन खाक झाली. सुदैवाने ही आग गॅस टँकरला न लागल्याने मोठी दुर्घटना टळली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com