खेडे विकासाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करा,महापौरांचा आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जून 2019

नाशिकः गेल्या सव्वादोन वर्षांपासून खेडे विकासासाठी आर्थिक तरतूद करूनही नगरसेवकांचे प्रस्ताव मंजूर होत नसल्याच्या मुद्द्यावर मंगळवारी (ता. 25) शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली. गटनेते विलास शिंदे यांनी महासभेला पत्र देत खेडे विकासाच्या निधीची मागणी केली. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी खेडे विकासाचे तातडीने प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश दिले. 

 महापालिकेत सत्ता आल्यानंतर पहिल्या अंदाजपत्रकात महापौर भानसी यांनी 23 खेड्यांसाठी निधी देण्याची घोषणा केली. मात्र अद्याप 23 खेड्यांतील नगरसेवकांना कामे करता आली नाहीत. यंदाच्या अंदाजपत्रकात तरतूद केली असली, तरी अधिकाऱ्यांकडून दखल घेतली जात नाही. प्रस्ताव नाकारले जात असल्याने खेडे भागातील रस्ते, ड्रेनेज, पथदीप या पायाभूत सुविधांची कामे होत नसल्याची खंत गटनेते विलास शिंदे यांनी व्यक्त केली.

गेल्या सव्वादोन वर्षांपासून खेड्यांचा विकास थांबल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. खेड्यातून महापालिकेला कर मिळत नाही का, असा सवाल करत महापौर ग्रामीण भागातून निवडून आल्याने खेडे विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मात्र अपेक्षा फोल ठरल्याचा आरोप केला. महापौर भानसी यांनी तातडीने खेडे भागातील ड्रेनेज, पथदीप, रस्ते विकासाचे प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news khade vikas nidhi