खानदेशात 63 टक्के मतदान 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑक्टोबर 2019

जळगाव : मॉन्सूनोत्तर पाऊस, तोंडावर आलेली दिवाळी आणि एकूणच मतदारांमधील निरुत्साह, असे चित्र विशेषत: शहरी मतदारसंघांमध्ये दिसून आले. परिणामी, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 63 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याचेही सांगण्यात आले. नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 78 टक्के मतदान झाले असून, तो राज्यातील उच्चांक असल्याचे मानले जात आहे. 

जळगाव : मॉन्सूनोत्तर पाऊस, तोंडावर आलेली दिवाळी आणि एकूणच मतदारांमधील निरुत्साह, असे चित्र विशेषत: शहरी मतदारसंघांमध्ये दिसून आले. परिणामी, खानदेशातील जळगावसह धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांत सरासरी 63 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. रात्री उशिरापर्यंत काही ठिकाणी मतदान सुरू असल्याचेही सांगण्यात आले. नवापूर मतदारसंघात सर्वाधिक 78 टक्के मतदान झाले असून, तो राज्यातील उच्चांक असल्याचे मानले जात आहे. 

मतदानाच्या माध्यमातून खानदेशातील विधानसभेच्या 20 मतदारसंघांमधील 164 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात "सील' झाले असून, त्याचा फैसला गुरुवारी (ता. 24) होणार आहे. खानदेशातील प्रमुख दिग्गज उमेदवारांमध्ये जलसंपदामंत्री गिरीश महाजन, पर्यटन विकासमंत्री जयकुमार रावल, सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची कन्या ऍड. रोहिणी खडसे, माजी मंत्री पद्माकर वळवी, माजी मंत्र्यांचे पुत्र भरत गावित व शिरीष नाईक, अनिल गोटे आदींचा समावेश आहे. 

सुरवातीला निरुत्साह, नंतर रांगा 
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी (ता. 21) सकाळी सात ते सायंकाळी सहा असे अकरा तास मतदान प्रक्रिया चालली. जळगावसह धुळे व नंदुरबार या जिल्ह्यांतील बहुतांश ठिकाणी सुरवातीच्या टप्प्यात मतदारांचा निरुत्साह जाणवला. विशेषत: जळगाव शहर, धुळे शहर, नंदुरबार, भुसावळ आदी शहरी मतदारसंघांमध्ये मतदारांनी मतदान प्रक्रियेकडे पाठ फिरविली. ग्रामीण भागातील काही केंद्रांमध्ये दुपारी चारनंतर गर्दी वाढू लागली. काही केंद्रांमध्ये तर रात्री आठपर्यंतही मतदान प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. 

सर्वाधिक नंदुरबार जिल्ह्यात 
खानदेशात सर्वाधिक मतदान नंदुरबार जिल्ह्यात झाले. त्यातही नवापूर मतदारसंघात रात्री आठनंतरही प्रक्रिया सुरू असल्याने तेथील आकडेवारी 80 टक्‍क्‍यांपर्यंत पोचण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली. जळगाव शहरात तर मतदानाच्या सरासरीने पन्नाशीही गाठली नाही. भुसावळ, धुळे या शहरांची स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती. धुळे जिल्ह्यात सरासरी 60 टक्के मतदान झाले. त्यात धुळे शहरात 50.20, धुळे ग्रामीण 64.20, शिंदखेड्यात 62.20, तर साक्री मतदारसंघात 62.20 टक्के मतदान झाल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली. 

काही ठिकाणी अत्यंत चुरस 
सुरवातीच्या टप्प्यात भाजप- शिवसेना महायुतीकडून झुकलेली व एकतर्फी वाटणारी लढत नंतरच्या टप्प्यात बऱ्यापैकी चुरशीची बनली. खानदेशातील 20 पैकी पाच- सात मतदारसंघ सोडले, तर प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. भाजप- शिवसेनेच्या बंडखोरांमुळे ही चुरस निर्माण झाली असून, त्यामुळे निकालाचा अंदाजही वर्तविणे विश्‍लेषकांना कठीण जात आहे. 

असे झाले मतदान 

जिल्हा--------- सरासरी 
जळगाव-------- 60 टक्के 
धुळे------------60 टक्के 
नंदुरबार --------67 टक्के 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news khandes vidhan sabha election voting 63 parcnteg