मृत्यूच्या तांडवात एकेक जीव अनमोल; केरळमधील पूरस्थितीत कापडणेतील जवानाचा अनुभव 

live photo
live photo

कापडणे : "केरळमधील पूरस्थिती भयावह आहे. तेथे मदतकार्यात काम करताना मृत्यूचे तांडव समोर दिसत होते. त्यातही एकेक जीव अनमोल समजून मदतकार्यात गुंतलो. आठ दिवसांत आमच्या तुकडीने शंभरावर कुटुंबांना सुरक्षितस्थळी पोचविले आहे. मी स्वतः आठ जणांना मल्लीमल्ला नदीतून वाहून जाताना काठावर आणले आहे. अंगावर रोमांच उभा राहील...', अशा शब्दांत आपला चित्तथरारक अनुभव बचाव पथकातील जवान आणि येथील विजय साहेबराव माळी यांनी "सकाळ'शी बोलताना व्यक्त केले. 

केरळमध्ये अतिवृष्टीमुळे अकरा हजारांवर कुटुंबांना फटका बसला आहे. देशभरातून मदत सुरू झाली आहे; परंतु अतिवृष्टी सुरू असतानाच आर्मीच्या बचाव पथकातील जवानांनी धाडसाने मोठी कामगिरी केली आहे. त्या पथकातील जवान अन्‌ येथील रहिवासी विजय माळी याने जीव धोक्‍यात घालून मोठे काम केले आहे. त्यांच्याशी "सकाळ' प्रतिनिधीने संपर्क साधला असता त्यांनी वस्तुस्थिती सांगितली. 
 
आम्हीही मृत्यूच्याच दारात 
अतिवृष्टीमुळे तिरुविल्ला जिल्ह्यातील मल्लीमिल्ला नदीचे पाणी शहरात अन्‌ शहरातील पाणी जागेवरच थबकलेले आहे. अन्नाची पाकिटे व जीवनावश्‍यक गरजा व औषधी हेलिकॉप्टरवरून टाकल्या जात आहेत. त्यावस्तू गरजूंपर्यंत पोहचवताना कठीण स्थिती निर्माण होते. घरांतून आजारी व्यक्तींना सुरक्षितस्थळी नेताना कठीण काम असते. पाच ते आठ फूट पाणी असलेल्या पाण्यातून मार्ग काढीत जावे लागत आहे. 
 
रोजच युद्धाचा प्रसंग 
दिवसरात्र बचावकार्य सुरू झाले आहे. थोडा वेळ मिळाला तर बसल्या बसल्याच पेंगुळायचे. आरोळी आली, की परत पळायचे. जेवणही उभ्या स्थितीतच पाकिटातूनच होत आहे. आर्मीतील मुंबई इंजिनिअरिंगचे पथक चित्तथरारक काम करीत आहे. यात खानदेशातील विजय माळी (कापडणे), श्री, मंदाळे (नंदुरबार) आणि श्री. गांगुर्डे (नाशिक) यांचे काम नजरेत भरविणारेच आहे. त्यांच्यासाठी गेले आठ दिवस युद्धासमच होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com