खानदेशकन्यांनी जागविला विदेशात राष्ट्राभिमान 

सुनील पाटील
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

चोपडा : खानदेशकन्यांनी न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्टला भारताचा 72 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या अनोख्या दिमाखदार पद्धतीने साजरा करीत विदेशात राष्ट्राभिमान दाखविला आहे. यावेळी होत असलेले दिमाखदार संचलन जगातील सर्वांत मोठी परेड मानली जाते. 

चोपडा : खानदेशकन्यांनी न्यूयॉर्कमध्ये 19 ऑगस्टला भारताचा 72 व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त फेडरेशन ऑफ इंडिया असोसिएशनच्या अनोख्या दिमाखदार पद्धतीने साजरा करीत विदेशात राष्ट्राभिमान दाखविला आहे. यावेळी होत असलेले दिमाखदार संचलन जगातील सर्वांत मोठी परेड मानली जाते. 
शीतल महाजन (चोपडा), रंजिता वानखेडे (जळगाव) या खानदेशकन्यांनी व परेश महाजन (धुळे) यांच्यासह न्यूयॉर्कमध्ये रहिवासी असलेल्या भारतीयांनी आपल्या देशाची सांस्कृतिक वारसा जपत मिरवणुकीत वंदेमातरम, जयहिंद, भारत माता की जय आदी घोषणा देत विदेशात राष्ट्राभिमान जागविला आहे. यावेळी अभिनेते अनुपम खेर, कमल हसन, श्रुती हसन, गायक कैलाश खेर यांचीही उपस्थिती होती. गेल्या 37 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. यावेळी न्यूयॉर्क, न्यूजर्सी, कनेक्‍टिकट या तिन्ही राज्यातून आलेल्या भारतीयांनी परेडचे आयोजन करीत स्वातंत्र्य दिन हा "भारत दिन' म्हणून साजरा केला. न्यूयॉर्क येथे 38 स्ट्रीट मॅनहटन येथील मॅडिसन अव्हेन्यूतील विविध रस्त्यावरून रॅली काढण्यात आली. रॅलीत महाराष्ट्रच्या जल्लोष ग्रुपने बॅण्ड पथक, ढोल ताशा, लेझीम पथकाद्वारे महाराष्ट्रातील विविध कार्यक्रमातून सांस्कृतिक परंपरा दाखविली. भारतीयांनी तयार केलेले चित्ररथ, बॅण्ड पथकांद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला. ध्वजवंदनानंतर शानदार सांस्कृतिक कार्यक्रमात कमल हसन, श्रुती हसन, गायक कैलाश खेर यांनी सहभाग घेत देशभक्ती पर गीत सादर केले. या कार्यक्रमात दीड लाख रुपयांचे बक्षीस रुपी रक्कम जमा झाली. 

केरळमधील पूरग्रस्तांना मदत 
न्यूयॉर्कमध्ये भारताचा 72 वा स्वातंत्र्य दिन साजरा करताना आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात दिमाखदार रॅलीस दीड लाख रुपयांची भेट दिली. ही भेट भारतीयांनी केरळमधील पूरग्रस्तांना मदतनिधी म्हणून जाहीर केली. 

Web Title: marathi news khandesh jalgaon pardesh khandeshkanya