बेडवर खिळलेल्या तरुणीचे 42 किलोमीटरचे "लक्ष्य' 

khandesh run premlta sing
khandesh run premlta sing

जळगाव : रक्तदाबाचा त्रास, थायरॉईड, वजन 90 किलोपेक्षा अधिक.. रक्तदाबाची गोळी दररोज घेण्यापर्यंतची स्थिती.. अक्षरश: अंथरुणावर खिळलेली अवस्था.. अशात एका तज्ज्ञ डॉक्‍टरने सल्ला दिला.. त्यावर अंमल केला आणि टप्प्याटप्प्याने चालणे, धावणे ही प्रक्रिया पार पाडली. तीन वर्षांत अगदी ठरवून मॅरेथॉनमध्ये "भरारी' घेतली.. आतापर्यंत 10, 21 किलोमीटरच्या स्पर्धा सर केल्या, आता 42 किलोमीटरच्या फूल मॅरेथॉनचे टार्गेट आहे.. 
लौकिकप्राप्त "पिंकेथॉन'च्या ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर असलेल्या प्रेमलता सिंग यांची ही प्रेरणादायी स्टोरी. "खानदेश रन'मध्ये नियमित धावणाऱ्या प्रेमलता यंदा कुटुंबातील विवाह सोहळ्यामुळे सहभागी होऊ शकत नसल्या तरी त्यांची ही वाटचाल अन्य धावणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरावी. 

अंथरुणावर खिळल्याची स्थिती 
मूळच्या बिहारमधील प्रेमलता सिंग पती प्रकाश सिंग यांच्या व्यवसायाच्या निमित्ताने जळगावात स्थायिक झाल्या. 2016 मध्ये त्यांना धड चालताही येत नव्हते. त्यांना थायरॉईड, उच्च रक्तदाबाचा त्रास होता. त्यांचे वजन तब्बल 90 किलो होते. अगदी अंथरुणावर खिळलेली अशी त्यांची स्थिती होती. त्यांना एका तज्ज्ञ डॉक्‍टरने चालण्याचा व पुढे जाऊन धावण्याचाही सल्ला दिला. तेव्हापासून त्यांनी मनाशी खूणगाठ बांधत धावण्याचे "लक्ष्य' ठरवले. 

2016 पासून सुरवात 
1016 पासून त्यांनी प्रथमत: "मॉर्निंग वॉक' सुरू केले. टप्प्याटप्प्याने चालण्याचे अंतर वाढविले. सुरवातीला प्रचंड त्रास झाला, पण त्यांनी हार मानली नाही. पुढे जाऊन अथक परिश्रम करत त्यांनी धावणेही सुरू केले. आणि तीनच वर्षांत त्यांनी विविध ठिकाणच्या मॅरेथॉन सर करण्याचे उद्दिष्ट्य साध्य केले. या तीन-चार वर्षांतच त्या 10 किलोमीटरच्या 10 आणि 21 किलोमीटरच्या 11 मॅरेथॉन धावल्या आहेत. त्यासाठी मुंबईतील डीआरजी ग्रुप जॉईन केला, त्यातून त्यांना मिलिंद सोमण यांनी "पिंकेथॉन'च्या ब्रॅन्ड ऍम्बॅसेडर म्हणून नियुक्ती केली. 

"लक्ष्य' 42 कि.मी.चे 
तीन-चार वर्षांपासून प्रेमलता नियमितपणे धावत आहेत. त्यांच्या या यशात पती प्रकाश सिंग यांचे महत्त्वाचे योगदान आहे. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी प्रेमलता यांना खंबीर साथ दिली.. सोबत तेदेखील धावू लागले. 10 किलोमीटरपर्यंतची मॅरेथॉन ते धावतात. प्रेमलता यांनी तर आता 42 किलोमीटरच्या "फूल मॅरेथॉन'चे लक्ष्य समोर ठेवले आहे. 
 
चालणे, धावणे हा शरीरासाठी उपयुक्त व्यायाम. प्रतिकूल शारीरिक स्थितीत मी मॅरेथॉनमध्ये यश मिळविले, तसे सर्वांनीच तंदुरुस्त राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. "दुखापतमुक्त' मॅरेथॉनसाठी प्रत्येकाने भर दिला पाहिजे. मॅरेथॉन ही एक चळवळ व्हावी. 
- प्रेमलता सिंग 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com