जळगावात गुरुवारपासून राज्य खो-खो स्पर्धा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

नाशिक ः जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडासंकुलात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित 35 व्या किशोर-किशोरी (14 वर्षांखालील) राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धांना गुरुवार (ता. 6)पासून सुरवता होणार आहे.

नाशिक ः जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडासंकुलात महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मान्यतेने व जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनतर्फे आयोजित 35 व्या किशोर-किशोरी (14 वर्षांखालील) राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धांना गुरुवार (ता. 6)पासून सुरवता होणार आहे.

स्पर्धेत 24 जिल्ह्यांचे किशोर-किशोरी संघ सहभागी होणार आहेत. या चारदिवसीय स्पर्धेचे अंतिम सामने 9 डिसेंबरला होतील. स्पर्धेतील सामने सकाळ व सायंकाळच्या सत्रात प्रकाशझोतात खेळवण्यात येतील. प्रथम साखळी व त्यानंतर बाद पद्धतीने खेळवल्या जाणाऱ्या या स्पर्धेत राज्यातील खो-खोपटूंचा रंगतदार खेळ पाहण्याची संधी यानिमित्ताने जळगावकरांना लाभणार आहे.

15 ते 19 डिसेंबरदरम्यान उत्तराखंडातील रूद्रपूर येथे होणाऱ्या 29 व्या किशोर-किशोरी गटाच्या राष्ट्रीय अजिंक्‍यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ या वेळी निवडण्यात येईल. 
गेल्या वर्षीच्या राज्य अजिंक्‍यपद स्पर्धेत किशोर गटात सोलापूर, तर किशोरी गटात पुण्याने विजेतेपद पटकावले होते. यंदादेखील ही विजयी परंपरा हे संघ राखू शकतील, याबाबत उत्सुकता आहे. स्पर्धेसाठी जय्यत तयारी सुरू असून, तीन मैदाने (कोर्ट) व सुसज्ज प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. 

स्पर्धेची गटवारी अशी : 
किशोर विभाग : 
अ गट : सोलापूर, बीड, धुळे 
ब गट : पुणे, परभणी, लातूर 
क गट ः मुंबई उपनगर, मुंबई, नंदुरबार 
ड गट : सांगली, रत्नागिरी, जळगाव 
इ गट ः औरंगाबाद, रायगड, सिंधुदुर्ग 
फ गट : नगर, नाशिक, जालना 
ग गट : ठाणे, पालघर, हिंगोली 
ह गट ः उस्मानाबाद, सातारा, नांदेड 
---- 
किशोरी विभाग : 
अ गट : पुणे, लातूर, रायगड 
ब गट : उस्मानाबाद, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग 
क गट ः नाशिक, जळगाव, धुळे 
ड गट : सोलापूर, जालना, परभणी 
इ गट ः नगर, मुंबई, बीड 
फ गट : सातारा, ठाणे, हिंगोली 
ग गट : पालघर, रत्नागिरी, नांदेड 
ह गट ः सांगली, औरंगाबाद, नंदुरबार 

Web Title: marathi news KHO KHO