नाशिक- चांदवड- नांदगाव- येथे अर्थसंकल्पाची होळी 

live
live

नाशिक  केंद्र सरकारने शेतकरी आत्महत्येचा विाचार केला नाही. अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काहीही नाही.स्वामिनाथन आयोग शिफारशी, शेतकरी कर्जमुक्ती 
केली नसल्याचा आरोप करीत आज किसान सभेतर्फे नाशिक जिल्ह्यात नाशिक, चांदवड नांदगाव येथे अर्थसंकल्पाची होळी करण्यात आली. 

राजू देसले ,नामदेव बोराडे, संपत थेटे अशोक दिवेकर, विजय दारडे, डी.पी. पाटील दामदोर पागेरे, दादाजी पाटील, मधुकर कसबे, नंदु बोबडे, विठोबा घुले 
यांच्या नेतृत्वखाली ही होळी झाली.त्यानंतर जिल्हाधीकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, कांद्याला 2100रुपये हमीभाव द्या. 200रुपयांऐवजी 500 रुपये अनुदान द्या, दुष्काळाची कामे त्वरित सुरु करा, मनरेगा अंतर्गत शेतकऱ्यांच्या बांधावरील कामाचा समावेश करा, 300रुपये प्रतिदिनी मजूरी 8 दिवसाच्या आत द्या, पिक विम्यातील शेतकरी विरोधी अटी रद्द करा, कसत असलेल्या वन जमिनी, गायरान जमीन नावावर करा, भूमिहिनांना जमीन द्या, शेतकरी शेतमजुरांना पेन्शन द्या. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व्यापक अभियान राबवून शेतकरी मदत केंद्र गावागावात सुरु करा, 2008 पूर्वी थकीत कर्ज सह 2017 पर्यन्त चे संपूर्ण कर्जमूक्ती करा. या मागण्या किसान सभेच्या वतीने करण्यात आल्या. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com