किसान सभेची आजपासून बेमुदत धरणे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

नाशिकः गेल्या वर्षी जूनला झालेल्या शेतकरी संपाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे दिलेले आश्‍वासन पाळले नाही. त्याविरोधात उद्या शुक्रवारी  (ता.1) किसान सभेतर्फे बेमुदत धरणे आंदोलन होणार आहे. 

नाशिकला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उद्या शुक्रवारी (ता.1) दुपारी बाराला आंदोलन सुरु होईल. किसान सभेने पुकारलेल्या शेतकरी संपाला उद्या एक वर्षे पूर्ण होत आहे. वर्षानंतरही शासनाने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमुक्तीची मागणी पूर्ण केली नाही. त्याविरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. कसत असलेल्या वनजमीनी, गायरान जमीनी व देवस्थान जमीनी धारकांना त्यांच्या मागण्यासाठी वारंवार रस्त्यावर येउन आंदोलन करावी लागली. शासनाकडून आश्‍वासन दिल्यानंतरही त्यावरील कार्यवाही संथपध्दतीने सुरु आहे. 

शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू कराव्यात. वनजमीनी त्वरीत नावावर कराव्यात. या मागण्यासाठी धरणे धरण्यात येणार आहे. किसान सभेचे राजू देसले, भास्करराव शिंदे, देविदासा भोपळे, विजय दराडे, सुकदेव केदारे, नामदेव राक्षे, जगन माळी, किरण डावखर,शिवाजी शिंदे, सुर्यभान शिंदे आदीच्या नेतृत्वाखाली बेमुदत धरणे धरले जाणार आहे. 
 
Web Title: marathi news kissan sabha agition