पतंगावर बेटी बचाव,बेटी पढावच्या जोडीला कार्टूनची छाप

युनूस शेख
सोमवार, 24 डिसेंबर 2018

जुने नाशिक: मकरसक्रांती निमित्ताने बाजारात नवनवीन आकर्षक पतंग, मांजा विक्रीस आला आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या पतंगीसह चिमुकल्याच्या आवडत्या कार्टुनच्या पतंगीची चलती बाजारात दिसत आहे. पतंग मांजाच्या दरात किरकोळ स्वरुपाची वाढ झाल्याचे विक्रेत्यानी सांगीतले. 

जुने नाशिक: मकरसक्रांती निमित्ताने बाजारात नवनवीन आकर्षक पतंग, मांजा विक्रीस आला आहे. सामाजिक संदेश देणाऱ्या पतंगीसह चिमुकल्याच्या आवडत्या कार्टुनच्या पतंगीची चलती बाजारात दिसत आहे. पतंग मांजाच्या दरात किरकोळ स्वरुपाची वाढ झाल्याचे विक्रेत्यानी सांगीतले. 

पतंगी प्रेमींसाठी बाजारात विविध प्रकार, आकार, सजावटीच्या पतंगी बाजारात विक्रीस दाखल झाल्या आहे. एक ते चार फुटांपर्यंत पगंत विक्री आल्या आहे. गेल्या दोन दोन वर्षात नोट बंदी, मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील तेढ दर्शवणारे, नवीन दोन हजारांची नोटांचे चित्र असलेली पतंग विक्रीस होत्या. यंदा मात्र सामाजिक संदेश देणारे विशेषता " बेटी बचाव, बेटी पढाओ ' संदेश देणाऱ्या पतंगीसह कार्टुन मालिकेतील दृश्‍यांची पतंगींचे जास्त प्रमाण आहे.

      मुली समाजाचा एक महत्वाचा घटक आहे. असे असताना आजही नागरीकांच्या गैरसमजचे बळी मुली ठरत आहे. अशा नागरीकांमध्ये जनजागृतीसाठी शासन विविध प्रकारच्या प्रयत्न करत आहे. प्रसार माध्यमांचाही यासाठी वापर केला जात आहे. तरीही बहुतांशी नागरीकांच्या मानसिकते बदल होत नाही. खेळाच्या माध्यमातूनही मुलीं बद्दल जनजागृता करण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही कंपन्यानी " बेटी बचाव, बेटी पढाओ ' संदेश देणाऱ्या पतंगी तयार केल्या आहे. त्यांची विक्री सद्या बाजारत होत आहे. एक तारखेनतंर आणखी नाविण्यपूर्ण पतंगी विक्रीस येण्याची शक्‍यता विक्रेत्यानी व्यक्त केली. दोन रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत पतंग तर 70 ते 300 रुपये मांजा रिळ विक्री होत आहे. 

पतंग मांजाचे प्रकार 
पतंग ः छोडा भीम, मोठुपतलू, टॉमेंजेरी, स्पायडर मॅन, सोनु माझाल्यावर भरो नाही का, मोदी पतंग उडवितानांचे चित्र असलेली पतंग, येवला स्पेशल धोबी, पक्षी आकाराच्या पतंग, कंदील पतंग, बलून पतंग तसेच साधी कागदी पतंग. 
मांजा ः पाच तारी कॉटन पांडा, नउतारी, बारा तारी कॉटन पांडा, स्टील पांडा, मैदान धुला, डिस्कव्हरी पांडा, बरेली मांजा. 

नायलॉन मांजा बंदीचे फलक 
नायलॉन मांजा वापर आणि विक्रीवर बंदी घातली आहे. पोलिसांकडूनही कारवाई केली जात आहे. त्यामुळे दुधबाजार भागातील बऱ्याच विक्रेत्यानी दुकानात नायलॉन मांजा विक्री होत नाही.नागरीकांनी मागणी करु नये आशयाचे फलक लावले आहे. तर काही विक्रेते आजही चोरी छुपे नायलॉन मांजा विक्री करत आहे. 

दरवर्षीच्या तुलनेत यंदा पतंगमध्ये 5 टक्के तर मांजामध्ये 10 टक्के वाढ झाली आहे. सद्या कार्टुन पंतगीकडे नागरीकांचा कल जास्त आहे. 
अय्युब शेख (विक्रेता) 
 

Web Title: marathi news kites sale