#BATTLE FOR NASHIK कोकाटेंचे आज शक्तिप्रदर्शन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

नाशिक ः नाशिक लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून बंडखोरी केलेले सिन्नरचे माजी आमदार ऍड. माणिकराव कोकाटे मंगळवारी (ता. 9) डोंगरे वसतिगृह मैदानावर जाहीर सभा घेणार आहेत. सभेच्या माध्यमातून कोकाटे भूमिका स्पष्ट करणार असून, तीच भूमिका अंतिम राहणार असल्याचे सोमवारी (ता. 8) पत्रकार परिषदेत सांगितले. सभेसाठी अख्खे डोंगरे वसतिगृह मैदान तयार करण्याचे काम अहोरात्र सुरू असून, किमान 50 हजार समर्थकांनी मैदान हाउसफुल करण्याचा त्यांचा प्रयत्न असून, तो यशस्वी ठरल्यास युतीलाच अधिक फटका बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 

डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर मंगळवारी दुपारी साडेचारला जाहीर सभा होणार आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच कोकाटे यांनी लोकसभा निवडणुकीची तयारी केली होती. या संदर्भात ते म्हणाले, की माझी निवडणूक लढविण्याची तयारी गेल्या दोन वर्षांपासून झाली होती. भारतीय जनता पक्षाने मला तशी तयारी करावयाचा आदेश दिला होता. त्यानुसार माझ्यासह हजारो कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. यादरम्यान शिवसेना व भाजपची युती झाल्यावर नाशिकची जागा भाजपला सोडावी यासाठी मी मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्र्यांना गळ घातली; परंतु यश आले नाही. कार्यकर्त्यांच्या भावना व तयारी लक्षात घेता माझी उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. उमेदवारी मागे घेण्याच्या अफवा विरोधकांनी उठवून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला; परंतु नाशिक लोकसभा मतदारसंघातील मतदारांशी चर्चा करूनच उमेदवारी कायम ठेवण्याचा निश्‍चय केला आहे. निवडणूक का लढवावी, या संदर्भात जाहीर सभेत भूमिका मांडणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार मंगळवारी डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर भूमिका मांडणार आहे. 

वाहने अडवू नका 
संपूर्ण लोकसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मेळाव्यासाठी नाशिकमध्ये येणार आहेत. यादरम्यान वाहने अडविण्याची शक्‍यता लक्षात घेता असा प्रकार प्रशासनाकडून घडू नये, असा इशारा कोकाटे यांनी दिला. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनाला सूचना देण्याची गरज आहे. माझी निवडणूक ही लोकांनी हातात घेतली असून, त्यांच्या भावनांचा अनादर होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, असे कोकाटे यांनी सांगितले

Web Title: marathi news KOKATE