#BATTLEFORNASHIK मोदींना एक मत कमी पडल्यावर  "त्यांना' कळेल "मैं क्‍या चीज हूँ-कोकाटे' 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

नाशिक ः लोकसभा निवडणुकीत नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर ऍड्‌. माणिकराव कोकाटे हे निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. याचपार्श्‍वभूमीवर 2014 मधील अपसंपदेसंबंधीच्या प्रकरणातील त्रूटींच्या पूर्ततेची नोटीस लाचलुचपत प्रतिबंध विभागाने काल (ता. 8) सायंकाळपर्यंत मुदत दिली होती. त्यावर ऍड्‌. कोकाटेंनी आज भूमिका स्पष्ट केली. पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी नरेंद्र मोदींना एक मत कमी पडल्यावर त्यांना "मैं क्‍या चीज हूँ!' हे कळेल असा पलटवार त्यांनी भाजपवर केला. 

नाशिकमधील सायंकाळच्या मेळाव्याअगोदर ऍड्‌. कोकाटे यांनी आज पुन्हा आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, की 2014 मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यावर मी मुंबईत होतो. त्यावेळी "सकाळ'मध्ये "कोकाटेंची गुप्त चौकशी सुरु' या आशयाचे वृत्त वाचले. तत्कालिन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पत्र लिहून माझी फाईल प्रलंबित असल्यास तत्काळ चौकशी सुरु करावी असे कळवले होते. 
------

Web Title: marathi news KOKATE