देवभाने-कापडणे फाट्यावरील महामार्गावर तासभर रास्ता रोको

जगन्नाथ पाटील
बुधवार, 3 जानेवारी 2018

कापडणे (ता.धुळे) :  कोरेगाव भीमा येथील घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने कापडणे फाट्यावर कापडणे परीसर बौध्द समाज अत्याचार निर्मुलन समितीने एक तास रास्ता रोको केला.

महामार्गाच्या दूतर्फा वाहनांच्या तीन किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात. तासभरात एकशे आठ क्रमांकाच्या दोन रुग्णवाहिका जाण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी स्वतंत्र व्यवस्था केली. महामार्गावर बसून घोषणा देत परीसर दणाणून गेला होता. आंदोलनार्थींनी विवधांगी विचारही व्यक्त केलेत.

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय : मंत्री अनंत हेगडे यांची मंत्रीपदासह पक्षातूनही हकालपट्टी करण्यात यावी. त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. मिलींद एकबोटे व संभाजी भिडे यांच्यावर अॅट्रासिटी अॅक्टने गुन्हा दाखल व्हावा. दंगलीत मृत पावलेल्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखाची मदत द्यावी. सी.बी.आय चौकशी झालीच पाहिजे आदी मागण्या करण्यात आल्यात. निवेदनावर समाधान देवरे, दीपक भामरे, सिध्दार्थ बागूल, प्रफुल्ल भामरे, सिध्दार्थ शिंदे, सुरेंद्र भामरे, सचिन शिंदे, शरिफ पिंजारी, अनिकेत सैंदाणे, संदीप ब्राम्हणे, पंडीत भामरे, प्रणव बच्छाव, संतोष भामरे, प्रवीण सैंदाणे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.  
   
रुग्णवाहिकांसाठी स्वतंत्र लेन अन सहकार्य
महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी शिस्तबध्द आंदौलन केल्याचा प्रत्यय आला. दोन रुग्णवाहिका सुसाट वेगाने गेल्यात.  रुग्णवाहिकांसाठी चौपदरी रस्त्यावर स्वतंत्र लेन खुली ठेवली होती. अन आंदोलनकर्त्यांची एक फळी  सहकार्य करीत होती.

Web Title: marathi news Koregaon Bhima riots Pune Riots Dhule News