नाशिकला 7 फेब्रूवारीपासून कृषी महोत्सव 

residentional photo
residentional photo

नाशिक,ता.2 ः नाशिकला येत्या 7 ते 11 फेब्रूवारी दरम्यान इदगाह मैदानावर जिल्हा कृषी महोत्सव होणार आहे. कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्यातर्फे पाच दिवस चालणाऱ्या महोत्सवात प्रदर्शन, कृषी मालाची विक्री व्याख्यानासह शासकीय योजनांची माहीती दिली जाणार आहे. जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी ही माहीती दिली. 

नाशिकला इदगाह मैदानावर गुरुवारी (ता.7) दुपारी दोनला संरक्षण राज्य मंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्या हस्ते कृषी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, कृषी व फलोत्पादन मंत्री सदाभाउ खोत, महापौर रंजना भानसी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल  सांगळे प्रमुख पाहूणे असतील. शुक्रवारी आठला सेंद्रीय शेती, गटशेती आणि शेतकरी उत्पादक कंपन्याचे चर्चासत्र होणार आहे. त्यात, सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीचे विलास शिंदे, प्रशांत नाईकवाडी, बाळासाहेब खेमनार, दुग्ध विकास आधिकारी डॉ.रत्नाकर आहेर, देवनदी शेतकरी उत्पादक कंपनीचे अनिल शिंदे यांची व्याख्यान होणार आहे. सायंकाळी सहाला पारंपारीक भारुड याप्रमाणे कार्यक्रम होतील. 

शनिवारी 9 फेब्रूवारीला खरेदीदार शेतकरी व विक्रेते यांचा मेळावा होईल. रविवारी 10 फेब्रूवारीला शास्त्रज्ञ डॉ.तुषार आंबरे यांचे कांदा साठवणूक तंत्रज्ञान, मृदा शास्त्रज्ञ 
डॉ.ओमप्रकाश हिरे जमीनीचे आरोग्य व भाजीपाला पिकांचे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन,तर मनोहर शिंदे यांचे सेंद्रीय शेतमाल विक्री व्यवस्थापन याविषयावर व्याख्यान होतील. सोमवारी 11 फेब्रूवारीला लखमापूरच्या डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ.सचिन शिंदे, सांगली येथील द्राक्ष गुरु शिवलिंग माळी, संशोधन डॉ.तुळशीदास वास्टेवाड यांची भाषणे होणार आहे. जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी संजीव पडवळ, कृषी विकास आधिकारी रमेश शिंदे हेही यावेळी उपस्थित होते. 

214 स्टॉल 
कृषी महोत्सवात 48 शासकीय स्टॉल, कृषी निविष्ठा विक्री-तंत्रज्ञान 48, धान्य महोत्सव 41, शेती अवजारे 10, खाद्यपदार्थ 20 गृहपयोगी वस्तूचे 20 याप्रमाणे 214 
स्टॉल लावले जाणार आहेत. त्यातील शासकीय कार्यालयासाठी 88 स्टॉल मोफत दिले जाणार आहे. महोत्सवासाठी 28.58 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून सर्वाना 
मोफत प्रवेश असेल. त्यात,अन्नधान्य, भाजीपाला, फळे,गुळ, हातसडीचा तांदूळ, कुळीद,मूग, उडीद दाळीसह कडधान्य, बचत गटानी तयार केलेले खाद्यपदार्थ, बचत गटाचे 
पापड,लोणचे,जाम यासह विविध मसाले चटण्याचे स्टॉल असतील. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com