सटाणा येथे महिलांची मॅरेथॉन स्पर्धा

रोशन खैरनार
सोमवार, 25 डिसेंबर 2017

सटाणा : आजच्या महिलांनी चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. २१व्या शतकातील महिला आता सबला बनली असून शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे केले. बागलाण तालुका महिला पतंजली योग समिती व येथील नारी सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी सात वाजता आयोजित युवती व महिलांसाठी सटाणा ते ठेंगोडा या नऊ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मोरे बोलत होते.

सटाणा : आजच्या महिलांनी चूल आणि मूल यापर्यंत मर्यादित न राहता सर्वच क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. २१व्या शतकातील महिला आता सबला बनली असून शिक्षणाबरोबरच क्रीडाक्षेत्रातही तिने आपली क्षमता सिद्ध केली आहे. असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी आज येथे केले. बागलाण तालुका महिला पतंजली योग समिती व येथील नारी सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज सकाळी सात वाजता आयोजित युवती व महिलांसाठी सटाणा ते ठेंगोडा या नऊ किलोमीटर अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी श्री. मोरे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, डॉ.किरण अहिरे, डॉ.प्रकाश जगताप, मुख्याध्यापक बी. एस. देवरे, डॉ. अमोल पवार, महिला पतंजलीच्या तालुकाध्यक्ष डॉ. विद्या सोनवणे, नारी सहाय्यता केंद्राच्या प्रमुख एड. सरोज चंद्रात्रे, भारत स्वाभिमानी संघटनेच्या लता शिंदे, महेंद्र बुवा, योगशिक्षिका योगिता काळे, शोभा धात्रक, नगरसेविका निर्मला भदाणे, बागलाण विकास मंचचे नंदकिशोर शेवाळे आदी उपस्थित होते. 

महिलांचे आरोग्य निरामय, सुदृढ राहावे, त्यांचे सबलीकरण व्हावे यासाठी महिलांना प्रेरणा देण्याचे कार्य पतंजली योग समिती व नारी सहाय्यता केंद्रातर्फे केले जात असल्याचे डॉ. विद्या सोनवणे यांनी स्पष्ट केले. पोलीस उपविभागीय अधिकारी शिंदे यांच्या हस्ते झेंडा उंचावून स्पर्धेचा प्रारंभ करण्यात आला. दोन गटात स्पर्धा घेण्यात आल्या. १५ ते ३० वर्ष वयोगटासाठी धावणे तर ३१ ते ६० वर्ष वयोगटातील महिलांसाठी जलद चालण्याच्या या मॅरेथॉन स्पर्धेत शहर व तालुक्यातील शेकडो महिला व युवतींनी उत्साहाने सहभाग घेतला होता. स्पर्धा सुरु होताच विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरून देवळा रस्त्यावर थेट ठेंगोडापर्यंत युवती धावत होत्या. महिलांनी देखील 'हम किसीसे कम नही', या उक्तीने न थांबता ठेंगोडा गाठले. कडाक्याची थंडी असतानाही युवती व महिलांचा उत्साह वाढत होता. 

सकाळी साडेआठ वाजता ठेंगोडा येथील श्री सिद्धिविनायक मंदिराजवळ अंतिम ठिकाणी एकेक स्पर्धक येऊ लागला. ९ किलोमीटरचे अंतर धावण्याच्या स्पर्धेत मोहिनी साबळे हिने ५० मिनिटे ४ सेकंदात तर जलद चालण्याच्या स्पर्धेत सौ. उर्मिला जाधव यांनी १ तास ६ मिनिटे व १५ सेकंदात पूर्ण करत बाजी मारली. १५ ते ३० वर्ष वयोगटात विमल महाले (द्वितीय), अश्विनी म्हाळसे (तृतीय), प्रिया जाधव (चतुर्थ) व नलीता गावित (पाचवा) यांनी तर ३१ ते ६० वयोगटात कृणाली खैरनार (द्वितीय), नंदिनी अहिरे (तृतीय), उषा वडजे (चतुर्थ) व छाया गायकवाड (पाचवा) यांनी क्रमांक मिळविला. 
श्री सिद्धिविनायक मंदिराच्या सभागृहात प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ डॉ. हेमांगी व्हावळ, डॉ. शशिकांत व्हावळ, डॉ. किरण अहिरे, डॉ. प्रकाश जगताप, निर्मला भदाणे, योगिता मोरे, योगशिक्षिका योगिता काळे, शोभा धात्रक आदींच्या हस्ते विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिक, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धा यशस्वितेसाठी अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे डॉ. मनोहर सोनवणे, सी. डी. सोनवणे, मोहन सूर्यवंशी, प्रा. मधुकर नंदाळे, प्रा. डी. एम. राठोड, अनुलोमचे संजय गोसावी, दादा खरे, डॉ.सिद्धार्थ जगताप, कल्पना पवार, शीतल जाधव, भारती अंधारे, छाया सोनवणे, अपेक्षा चव्हाण, प्रतिभा शिंदे, निर्मला भदाणे, रुपाली कोठावदे, सुजाता पाठक, आशा भदाणे, संगीता मोरे, मेघना भावसार, वर्ष शिरोडे, अनिता इसई, प्रशांत महाले, गणेश वाघ, एड.सोमदत्त मुंजवाडकर, सुनील जगताप, परेश पाठक, श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्ट आदींनी विशेष परिश्रम घेतले. 

सटाणा शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच महिलांसाठी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्याने महिला व युवतींमध्ये मोठा उत्साह होता. पहाटे ६ वाजल्यापासून कडाक्याच्या थंडीतही महिला व युवतींचा लक्षणीय सहभाग असल्याने स्पर्धेला आगळेवेगळे महत्व प्राप्त झाले होते. विमल कोठावदे (वय ६५), शोभा शिवदे (वय ५७) व लताबाई शिरसाठ (वय ५८) या वृद्ध महिलांनी न थांबता पार केलेले ९ किलोमीटरचे अंतर हे स्पर्धेचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. 

Web Title: Marathi news ladies marathon conduct in satana