लष्कर'नी खाद 'परती' नी मार... ऐन दिवाळीले कणीसले फुटना कोब!

योगेश बच्छाव : सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

सोयगाव, ता. २५ : गेल्या दहा दिवसांपासून सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे कापणीस व सोगणीस आलेले बाजरी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी मका पिकावर लष्करी आळीने थैमान घातले होते त्यात आता अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान त्यामुळे  
'लष्कर' नी खाद 'परती' नी मार....अशी प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडून एकायला मिळत आहे.

सोयगाव, ता. २५ : गेल्या दहा दिवसांपासून सततचे ढगाळ वातावरण व पावसामुळे कापणीस व सोगणीस आलेले बाजरी, मका व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यावर्षी मका पिकावर लष्करी आळीने थैमान घातले होते त्यात आता अवकाळी पावसाने पिकांचे नुकसान त्यामुळे  
'लष्कर' नी खाद 'परती' नी मार....अशी प्रतिक्रिया तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तोंडून एकायला मिळत आहे.

आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीकामे रखडली आहेत. सोंगणीस आलेले पीक डोळ्यासमोर वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतात उघड्यावर कापून पडलेल्या बाजरी, मका व इतर पिकांना पावसाचा फटका बसल्याने बाजरीच्या कणसाना आता पावसाच्या पाण्याने कोंब फुटण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजरीचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतांश भागात बाजरी, मका काढून शेतात पडली आहे. पावसामुळे काढणी व सोंगणीचे काम थांबले आहे. तसेच अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळा कांद्याचे टाकलेले बियाणे खराब झाले आहे. शेतकऱ्यांनी आपल्या खिशातील पैसे खर्च करून मोठ्या प्रमाणात मजूर लाऊन बाजरी, मका पिकाची कापणी केली मात्र आता ढगाळ वातावरण आणि त्यात पाऊस यामुळे सर्वच कामे रखडली आहेत.

यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगाम चांगला येणार असल्याची चिन्हे असताना पावसाने अचानक हजेरी लावल्याने रब्बी हंगाम लांबणार आहे. तालुक्यातील बहूतांश गावात रब्बीची पेरणी झालेली नाही. यंदा पावसाने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिराऊन नेला आहे.  तालुक्यातील अनेक गावांमध्ये ओढे, नाले, बंधारे भरून वाहत आहेत.  दिवाळी सणाच्या तोंडावर गरज नसताना आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पाडले आहे. त्यामुळे ग्रामीण भागात काहीशी नाराजी दिसून येत आहे. 
 

कोट : गेल्या दहा बारा दिवसापासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने त्यात रोजच पावसाची हजरी यामुळे आमच्या सोंगणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. आठ दिवसापासून बाजरी काढून ठेवली आहे. मात्र सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शेतीची सर्वच कामे रखडली आहेत.
- गणेश शेवाळे, शेतकरी, टेहेरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news lashkar aali