मराठी भाषेच्या कायद्यासाठी मुंबईत धरणे आंदोलन-लक्ष्मीकांत देशमुख

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 1 जून 2019

नाशिकः राज्यातील सर्वच मंडळांच्या इंग्रजी, गुजराती, हिंदी तसेच इतर माध्यमांच्या शाळांमध्ये दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व कार्यालये, व्यावसायिक संस्था, बॅंका या ठिकाणीही मराठी भाषा सक्तीची केली जावी यासाठी मराठी साहित्य महामंडळासह इतर संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मराठी भाषेची सक्ती व्हावी यासाठी कायदा केला जावा या मागणीसाठी येत्या विधीमंडळ अधिवेशनावेळी मुंबईत धरणे आंदोलन केले जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी दिली.

 5 जून रोजी मुंबईत सहभागी होणाऱ्या सर्व संस्थांची एकत्रीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात श्री. देशमुख यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी उपाध्यक्ष कवी किशोर पाठक, कार्याध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर, प्रमुख सचिव डॉ. धर्माजी बोडके, प्रा. डॉ. शंकर बोऱ्हाडे, श्रीकांत बेणी, शंकर बर्वे, देवदत्त जोशी, प्रा. डॉ. भास्कर ढोके, प्रा. अशोक सोनवणे, कवी दिलीप पाटील उपस्थित होते. 
श्री. देशमुख म्हणाले, की इंग्रजी माध्यमात मराठी शिकवणे अनिवार्य केले पाहिजे. उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी बोलता आले पाहिजे. इंग्रजी शाळेचे मराठीकरण आणि मराठी शाळेचे सक्षमीकरण झाले पाहिजे. मराठी भाषा बोलली गेली तरच मराठी नाटके, चित्रपट, पुस्तके वाचली जातील. त्यातूनच आपली संस्कृती टिकेल. अन्यथा शेतकरी, शेतमजुरांची मुले मराठी शाळेत आणि मध्यम तसेच उच्चवर्गीयांची मुले इंग्रजी शाळेत गेल्याने पुढे भाषिक फाळणी होण्याचा धोका आहे असेही ते म्हणाले,

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news laxmikant deshmukh says