शिवसेनेचे नरेंद्र दराडे, अपक्ष परवेझ कोकणी, गायकवाड यांचे अर्ज दाखल 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

नाशिकः विधान परिषदेच्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, कॉग्रेस पक्षांकडून ज्ञानेश्‍वर गायकवाड, तर जिल्हा 
बॅकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांच्यासह देवळा येथील अशोक आहेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसांपर्यत 7 उमेदवारांचे 9 अर्ज दाखल झाले. 

नाशिकः विधान परिषदेच्या स्थानीक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीसाठी आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे, कॉग्रेस पक्षांकडून ज्ञानेश्‍वर गायकवाड, तर जिल्हा 
बॅकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांच्यासह देवळा येथील अशोक आहेर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवसांपर्यत 7 उमेदवारांचे 9 अर्ज दाखल झाले. 

शिवसेनेने जाहीर केल्याप्रमाणे आज शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, हरिश्‍चंद्र चव्हाण, आमदार अनिल कदम, राजाभाउ वाजे यांच्यासोबत अर्ज भरला. याशिवाय शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख व इतर पदाधिकाऱ्यांसोबत आणखी एक अर्ज भरला. 
संर्पक प्रमुख भाउसाहेब चौधरी, माजी मंत्री बबनराव घोलप, महिला आघाडी संर्पकप्रमुख सत्यभामा गाडेकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर, भाउलाल तांबडे, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, विलास शिंदे, आदीसह शिवसेनेचे मोठ्या संख्येने नगरसेवक उपस्थित होते. 
परवेज कोकणीचा अर्ज 
राष्ट्रवादी कॉग्रेसमधून काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केलेले जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेचे माजी अध्यक्ष परवेज कोकणी यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत जिल्हा बॅकेचे विद्यमान अध्यक्ष व भाजपचे केदा आहरे, तसेच त्र्यंबकेश्‍वर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांच्यासह त्र्यंबकेश्‍वरचे भाजप समर्थक नगरसेवक उपस्थित होते. एकाबाजूला भाजपचे आमदार पदाधिकारी कुणी फिरकले नसतांना भाजपचे असूनही आघाड्या करुन निवडून आलेले भाजपचे नगरसेवकांच्या गट एकत्र करुन कोकणी यांनी अर्ज दाखल केला. त्यामुळे म्हटले तर, भाजपचे तांत्रीक दृष्ट्या म्हटले तर, अपक्ष अशा भाजप नगरसेवकांना एकत्र घेउन त्यांनी अर्ज भरला. 

कॉग्रेसकडून ज्ञानेश्‍वर गायकवाड 
कॉग्रेस पक्षांकडून तालुकाअध्यक्ष ज्ञानेश्‍वर गायकवाड यांनी माजी आमदार अनिल आहेर यांच्यासोबत येउन कॉग्रेस पक्षांतर्फे अखेरच्या क्षणी अर्ज दाखल केला. दुपारी सव्वा दोनलाच जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या श्री गायकवाड उमेदवारी अर्ज दाखल करीत असतांना त्यांना कॉग्रेसचे निरीक्षक मनोज शिंदे, नामदेव चव्हाण यांनी दूरध्वनीद्वारे अर्ज न भरण्याची सूचना केली. श्री गायकवाड अर्ज न भरताच माघारी निघाले. पायऱ्या उतरतात असतांना पून्हा दूरध्वनी आला आणि एबी फॉर्म न भरताच नुसताच अपक्ष म्हणून अर्ज भरुन ठेवण्याचा फोन आल्याने त्यांनी पून्हा येउन 8 मिनीटे बाकी असतांना कॉग्रेस पक्षांचा उमेदवार म्हणून अर्ज भरला मात्र ए व बी फॉर्म न भरताच अर्ज दाखल 
केला. 

देवळ्यातून आहेरचा अर्ज 
तत्पूर्वी देवळा नगरपंचायतीत अशोक आहेर यांनी जिल्हा बॅकेचे अध्यक्ष व भाजपचे पदाधिकारी केदा आहेर यांच्या तेथील नगरसेवकांना सोबत येउन दुसरा अर्ज भरला.श्री 
आहेर यांनी देवळा नगरपंचायतीतील नगरसेवकांसोबत अपक्ष म्हणून अर्ज भरला. 
 

Web Title: MARATHI NEWS LEGISLATIVE APPLICATION