'तो' बिबट्या मालेगाव जलवाहिनीवरचा नाहीच!

शिवनंदन बाविस्कर
रविवार, 24 डिसेंबर 2017

पिलखोड (ता. चाळीसगाव) - गेल्या तीन दिवसांपासून व्हॉट्सअपवर मालेगाव जलवाहिनीवर बिबट्या बसल्याचे फोटो चाळीसगाव तालुक्यात व्हायरल झाले आहेत. मात्र, ती निव्वळ अफवा असून वन विभागाने त्या सर्व गोष्टींचा तपास करत तो फोटो मालेगाव जलवाहिनीवरचा नसल्याचा खुलासा प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी 'सकाळ'शी बोलताना केला आहे. गिरणा परिसरातल्या बिबट्याला ठार केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये भीती कमी होत असताना, मालेगाव जलवाहिनीवर बिबट्या पाहिल्याचे नवीन फोटो व्हायरल झाले आहेत. याशिवाय एका वृत्तपत्राने (सकाळ नव्हे) ही बातमी प्रकाशित केल्यामुळे ग्रामस्थांची दिशाभूल होऊन भीतीचे वातावरण पसरले आहे.   

प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी संजय मोरे यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले की, 'हे फोटो मालेगाव जलवाहिनीवरचे नसून बोरिवलीकडे असलेल्या एका जलवाहिनीचे फोटो आहेत. फोटोत असलेल्या जलवाहिनीचा नंबर पाहून आम्ही मालेगाव जलवाहिनीवर जाऊन तपास केला. त्यात हा नंबर व जलवाहिनीत कुठलेही साम्य दिसले नाही.' मोरे यांनी बोरिवली नॅशनल पार्कचे वन्यजीव विकास समितीचे मयूर कामत यांना बिबट्याचे फोटो टाकले असता, त्यांनी हे फोटो शहापूर जलवाहिनीचे असून ते वर्षभरापूर्वीचे असल्याचे सांगितले.

अफवा पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई!
परिसरातले ग्रामस्थ आता कुठे भीतीच्या छायेतून स्वतःला सावरत आहेत. त्यात असे चुकीचे फोटो व्हायरल झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाहक भीती पसरते आहे. ही अफवा व्हॉट्सअपवर फिरत असल्याने शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहेत. शिवाय एकाकडून दुसऱ्याकडे चुकीचा संदेश पसरत आहे. चुकीची भीतीदायक अफवा पसरवणाऱ्या नेटिझन्सवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकरी संजय मोरे यांनी 'सकाळ'ला दिली. त्यामुळे कुठलीही माहिती खात्री केल्याशिवाय व्हायरल करू नये.

Web Title: Marathi News Leopard Rumor viral On Whats app