जन्मदात्रीच्या खूनप्रकरणी  तरुणाला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

नाशिक : टिटवे (ता.दिंडोरी) येथे दारु पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे जन्मदात्या आईचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. अशोक लक्ष्मण वटाणे (27, रा. टिटवे, ता. दिंडोरी, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. ही घटना 15 एप्रिल 2015 रोजी घडली होती. 

आरोपी अशोक वटाणे यास मद्याचे व्यसन होते. त्याच्या या त्रासाला कंटाळून त्याची पत्नीही त्यास सोडून निघून गेली होती. तो जन्मदात्या आईलाही सतत मारहाण करून त्रास देत होता. 15 एप्रिल 2015 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास त्याने आई शांताबाई वटाणे यांच्याकडे दारुसाठी पैशांची मागणी केली. त्यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, त्याने चुलीजवळील लोखंडी फुकणी घेतली आणि जन्मदात्या आईला त्या फुकणीने मारले. त्या लोखंडी फुकणीच्या घावामुळे शांताबाई यांच्या डोळ्याच्या भुवई आणि कपाळावर जबर दुखापत होऊन हनुवटीही फुटली. त्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या होत्या. याप्रकरणी काशिनाथ पवार यांच्या फिर्यादीनुसार वणी पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचा तपास वणीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक एम.डी. खोडवे यांनी तपास करीत, जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. 
हा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायधीश श्रीमती एस.एस. नायर यांच्यासमोर चालला. सरकारी पक्षातर्फे ऍड. विद्या जाधव यांनी काम पाहताना 7 साक्षीदार तपासले. 

Web Title: marathi news LIFE IMPRISIONMENT