"लिनिअर अलजेब्रा'चा पेपर पुन्हा,शनिवारी निर्णय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एस.वाय.बी.एस्सी. अभ्यासक्रमातील "लिनिअर अलजेब्रा' विषयाचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी नाशिक सायबर सेल विभागाकडे गुन्हा दाखल करण्यात आला. दोन युवकांना अटकही केली आहे.

विद्यापीठाने गठीत केलेल्या समितीने गोपनीय अहवाल विद्यापीठाकडे पाठविला असून विद्यापीठात 12 मेस होणाऱ्या बैठकीत फेरपरीक्षा घ्यावी की नाही, याबाबत अंतीम निर्णय घेतला जाईल. दरम्यान प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता या विषयाची फेरपरीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागेल, असे सूत्रांकडून समजते. 

गेल्या महिन्यात 28 एप्रिलला पेपरफुटीचा प्रकार नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात उघडकीस आला होता. विद्यापीठाच्या नियोजित वेळापत्रकानुसार 28 एप्रिलला होणाऱ्या एस.वाय.बी.एस्सी. अभ्यासक्रमाच्या लिनिअर अलजेब्रा विषयाचा पेपर 27 एप्रिललाच उपलब्ध झाल्याचे उघडकीस आले होते. यानंतर आम आदमी पक्षातर्फे फेरपरीक्षा घेण्याची मागणी केली होती.  विद्यापीठाचे अधिसभा सदस्य अमित पाटील यांनीही या प्रकरणी पाठपुरावा केला होता. 

अखेर काल (ता.6) नाशिक सायबर विभागात क. का. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी आदेश गजेंद्र चोपडे व चिन्मय दीपक अटराव्हलकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्व प्रकरणाविषयीचा सखोल अहवाल समितीने विद्यापीठाला पाठविला आहे. सदरचा पेपर पुन्हा घेतला जाईल, की नाही याबद्दल समितीतर्फे माहिती देण्यात आलेले नाही.

समितीने आपले म्हणणे अहवालात नमुद केले असून 12 मेस विद्यापीठात होणाऱ्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यासंदर्भातील अंतीम निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले आहे. पेपरफुटीची तीव्रता लक्षात घेता, "लिनियर अलजेब्रा' विषयाचा पेपर विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावा लागेल, असे सूत्रांकडून सांगितले जात आहे. 

समितीने आठवड्याभरात लावला छडा 
पेपरफुटीच्या प्रकरणांत बहुतांश वेळा चौकशीसाठी मोठा कालावधी निघून जातो. अशा प्रकरणांत पुढे फारसे काही होत नाही. पण पेपरफुटीची घटना उघडकीस आल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे शिताफितीने चौकशी समिती नेमली होती. केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या या त्रिसदस्यीय समितीने लगेचच दुसऱ्या दिवशी सखोल चौकशीला सुरवात केली होती. आठवड्याभरात या प्रकरणाचा छडा लावला. या प्रकरणास जबाबदार व्यक्‍तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमी कालावधीत अतिशय संवेदनशीलपणे समितीने प्रकरण हाताळल्याने समितीचे विद्यापीठ स्तरावर कौतुक होत आहे. 
 
Web Title: marathi news linier algebra paper