कर्जाचे आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणारे गजाआड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

नाशिक : लोहणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास 5 कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडे अठरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण सोसायटी, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे दोघा संशयिताचे नाव असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 
   

नाशिक : लोहणेर (ता. देवळा) येथील शेतकऱ्यास 5 कोटी कर्ज काढून देण्याचे आमिष दाखवून साडे अठरा लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघा संशयितांना गंगापूर पोलिसांनी अटक केली. राकेश बापू पानपाटील (33, रा. अस्मिता बंगला, प्रियंका पार्क, गाढवे पेट्रोल पंपासमोर, जगतापनगर, सिडको), आकाश विजय सोनवणे (23, रा. कंगण सोसायटी, जयभवानी रोड, नाशिकरोड) असे दोघा संशयिताचे नाव असून न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. 
   

धनंजय एकनाथ महाजन (रा. लोहोणेर, ता. देवळा) यांच्या फिर्यादीनुसार, ते शेतकरी असून, त्यांना कर्जाची आवश्‍यकता होती. त्यांना त्यांच्या परिचयातील मित्राने संशयित राकेश पानपाटील, आकाश सोनवणे या दोघांशी ओळख करून दिली होती. संशयित पानपाटील, सोनवणे यांनी धनंजय महाजन यांना पाच कोटींचे कर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखविले.

      संशयितांनी मुंबई येथील बालाजी फायनान्स कंपनीकडून 5 कोटी 23 लाखांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगत संशयितांनी महाजन यांचा विश्‍वास संपादन केला आणि त्यांना त्या रकमेचा धनादेशही दिला. मात्र कर्जाच्या रकमेसाठी लागणाऱ्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली संशयितांनी धनंजय महाजन यांच्याकडून 18 लाख 60 हजार घेतले. तसेच त्यांच्या कोऱ्या स्टॅम्पवर सह्या व अंगठे घेतले होते. 

    दरम्यान, श्री. महाजन यांनी बॅंकेत 5 कोटी 23 लाखांच्या रकमेचा धनादेश वटविण्यासाठी टाकला असता, सदरचे चेक बनावट असल्याचे समोर तर आलेच, शिवाय त्या चेकवरील बॅंक खातेच अस्तित्वात नसल्याचे बॅंकेने सांगितले असता, फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी गेल्या 9 ऑगस्टला गंगापूर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे, उपनिरीक्षक समीर वाघ यांच्या पथकाने संशयितांची तांत्रिक माहितीच्या आधारे शोध घेत, सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये संशयित पानपाटील व सोनवणे या दोघांना अटक केली. पोलिसी खाक्‍या दाखविल्यानंतर दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली. संशयितांकडून गुन्हयातील 18 लाख 60 हजार रुपयांची रोकड, विधानसभा आमदार असे चिन्ह असलेली 7 लाख रुपयांची टाटा सफारी कार (एमएच 15 इबी 144), 30 हजार रुपयांचा आयफोन, 10 कोटी व 1 कोटी 25 लाख रुपये लिहिलेले बनावट धनादेश, विविध बॅंकाचे बनावट स्वाक्षरी असलेले बनावट धनादेश असा सुमारे 25 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. सदरची कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समीर वाघ, हवालदार माणिक गायकर, कैलास भडिंगे, दत्ता गायकवाड, नितीन नेटारे, तुषार देसले, केशव ढगे, सचिन सुपले यांनी बजावली. 

Web Title: marathi news loan scam accused arrested