सुका मेव्यासह, पौष्टिक लाडवाच्या मागणीत थंडीमुळे वाढ

Dry Fruits
Dry Fruits

खामखेडा : सुदृढ आरोग्यासाठी हिवाळा हा ऋतू महत्त्वाचा असतो.हिवाळ्याच्या दिवसात घरोघरी सुकामेव्यांपासून लाडू बनविण्याची जय्यत तयारी सुरू असते.याकरीता बाजारेपठेत काजू, बदामसोबतच मेथी, डिंक आणि नुसते सुकामेव्याचे लाडू तयार करण्यासाठी लागणारा सुका मेवा विक्रीसाठी काही दुकानांमध्ये उपलब्ध असतो. मात्र गेल्या महिन्याभरात सुकामेवा आणि पौष्टिक लाडवांच्या मागणीत दुपटीने वाढ झाली आहे. मागमी वाढल्याने लाडवांच्या किंमतीत २० ते ३० टक्के वाढ झाली आहे.

साधारणत: डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते ह्या या थंडीच्या दिवसात पौष्टिक वस्तू खाव्यात, असा सल्ला डॉक्टर देतात. मात्र पूर्वापार या दिवसांमध्ये साजूक तुपातील मेव्यांचे लाडू करून ते पहाटे वा सकाळी उठून खाण्याची पद्धत अनेकं घरात  पाहायला मिळते.हिवाळ्यामुळे बाजारात विविध प्रकारचे डिंकाचे लाडू, बदाम, काजू, किसमिस, खजूर, खारिक, खोबरे, मनुके उपलब्ध झाले आहेत. मागील एका आठवड्यापासून सुकामेवा आणि पौष्टिक लाडूंना मागणी वाढली आहे.                            

ग्राहकांकडून खोबर्याला मागणी आहे. त्याचबरोबर बदाम, काजू, डिंक, गोडंबी, आळीव, अंजीर, अक्रोड, मगज, खसखस यांचा वापर डिंक लाडू, मेथीलाडू, पौष्टिक लाडू यांचा देखील वापर करण्यात येतो त्यामुळे ह्या सुक्या मेव्यास मागणी वाढली आहे.सुकामेव्याचेच भाव जास्त असल्याने रेडीमेड लाडू खरेदीकडे सुद्धा मोठी मागणी असते.

सर्व प्रकारच्या लाडूचे दर लाडू, सुमामेवाचे भाव

मेथी लाडू ४५०ते ५००,कमरकस लाडू ८०० रुपये, डिंकलाडू ६००ते ८००, पौष्टिक लाडू ६०० ते ७०० रुपये ,पंचडाळीचे लाडू ४८० ते ५२० , ‌सुकामेवा लाडू ५०० ते ६००, खोबरा २१० ते २२० रुपये किलो,खोबरा किस २४० ते २६०, खारिक १६० ते ३००, खारिक पावडर २४०, काजू ९६० ते १३००, बदाम ७६० ते १०००, डिंक ४०० ते ५००, गोडंबी ७००ते ७१५, मेथी ९० ते १००, अंजीर ७०० ते १२००,अक्रोड ५०० ते ६००, मगज १३०० तगे १४००, काळी खजूर १५० ते १८००, पिस्ता ११००, पिस्ता (बिगरनमक) १६०० रुपये किलो.

ग्रामीण तशेच शहरातील गृहिणींकडून ह्या सुका मेव्याची खरेदी करून घरीच लाडू तयार करण्यास पसंती दिली जाते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com