भारत पेट्रोलियमची पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 7 डिसेंबर 2017

निफाड : निफाड तालुक्यातील नांदूरमध्यमेश्वर ते खानगावथडी तालुका येथील शेत जमिनीत भारत पेट्रोलियमची मनमाड ते मुंबई जाणारी पाईपलाईन आज (गुरुवार) फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात डिझेलची गळती झाली.

याबाबतची माहिती मिळताच बीपीसीएलचे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले अाहेत. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, डिझेलची मोठी नासाडी झाली आहे. सध्या दुरुस्तीचे काम वेगाने सुरु आहे. गळती झालेले डिझेल टँकरमध्ये भरण्यात येत असून, याठिकाणी कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. नागरिकांना या भागात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे

Web Title: marathi news local nashik news petroleum pipeline damage