तनिष्का गटप्रमुख रुपाली माळी यांना 'साने गुरुजी युवा पुरस्कार' जाहीर

mali
mali

सोनगीर : येथील पंचायत समिती सदस्या आणि तनिष्का गटप्रमुख रुपाली रविराज माळी यांना मुंबईच्या हुंडाविरोधी चळवळीने यंदाचा 'साने गुरुजी युवा पुरस्कार' जाहीर केला आहे. येत्या 12 जानेवारीला विलेपार्ले (मुंबई) येथील साठे महाविद्यालयाच्या नाट्यगृहात पुरस्काराचे वितरण होणार आहे. 10 हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप असणार आहे.    

स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिवसाचे औचित्य साधून या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्थेचे युवा पुरस्कार देण्याचे हे 30 वे वर्ष आहे. हुंडाविरोधी चळवळीचे संस्थापक अध्यक्ष डी. बी. ऊर्फ मामासाहेब कुलकर्णी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त यंदा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यातील विजेत्यांनाही त्यादिवशी पारितोषिक दिले जाणार आहेत. युवा पुरस्कारासाठी रुपाली माळी व इस्रोमधील मुंबईचे पहिले शास्त्रज्ञ प्रथमेश हिरवे यांची निवड झाली आहे.              

तनिष्का गटप्रमुख रुपाली माळी यांना राज्य युवा कल्याण विभागातर्फे 2015-16 मध्ये नाशिक विभागातून राज्यस्तरीय युवा पुरस्कार, तत्पूर्वी त्याच वर्षी जिल्हास्तरीय युवती पुरस्कार मिळाला आहे. 

माळी यांनी तनिष्का गटामार्फत महिलांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग, रोग निदान शिबिर आदी उपक्रम राबवले होते. तसेच पाणी टंचाई, पर्यटन विकास, सुवर्णगिरी किल्ल्यांची स्वच्छता, ग्रामीण रुग्णालयातील सोयी सुविधा, मुंबई - आग्रा महामार्गाजवळील सर्व्हिस रोड, टोलप्लाझावरील मनमानी, बालाजीनगरसाठी रस्ता, दारूबंदी, युवती कल्याण कार्यक्रम आदी आंदोलनात सहभाग घेतला. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना साने गुरुजी पुरस्कार जाहीर झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com