सुरळीत वीज पुरवठ्यासाठी जळगाव बुद्रुक ग्रामस्थांचा रास्ता रोको

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 डिसेंबर 2017

जळगाव : कसाबखेडा व पोही या गावांना जळगाव बुद्रुक येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्राला जोडण्यात यावे, या मागणीसाठी आज ग्रामस्थांनी रास्तारोको आंदोलन केले. या रास्ता रोकोमुळे औरंगाबादकडे जाणाऱ्या राज्यमार्गावरील वाहतुकीची दीड-दोन तास कोंडी झाली.

पोलिसांनी वीज वितरणाचे सहाय्य्क कार्यकारी अभियंता मधुकर साळुंके यांना घटनास्थळी पाचारण केल्यावर दोन दिवसांत जळगाव बुद्रुक येथील उपकेंद्रातून वीज पुरवठा करून देऊ या साळुंके यांच्या तोंड आश्वासनावर विश्वास ठेवीत दुपारनंतर ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.

दरम्यान या प्रश्नावर दहा महिन्यांपूर्वी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवर मतदान घेण्याचा निर्णय घेणाऱ्या ग्रामस्थांची समजुतीनंतर प्रशासनाने घातली होती. मात्र, त्यांनतर आजतागायत या मागणीच्या अनुषंगाने वीज वितरण विभागाने कुठल्याही प्रकारची पाऊले उचलली नव्हती. त्याचा उद्रेक आज या रास्ता रोको आंदोलनात दिसून आला. व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे संचालक व बाजार समितीचे माजी सभापती विजय इप्पर सरपंच कांतीलाल इप्पर माजी सरपंच काशिनाथ काळे,शांताराम इप्पर,गोकुळ इप्पर,श्यामराव पवार,तुळशीराम शिंगाडे,हेमंत चव्हाण,मनोज जाधव,अशोक भाबड आदी ग्रामस्थांनी आज सकाळी कासारी बस स्थानकासमोर असलेल्या नांदगाव औरंगाबाद हा राज्यमार्ग अडविण्यास सुरवात केली.

या रास्ता रोको आंदोलनाची पूर्व कल्पना प्रशासनाला देण्यात आली असल्याने पोलिस बंदोबस ठेवण्यात आला होता. मात्र, आंदोलक ग्रामस्थांच्या मागणीबाबत ठोस कारवाईसाठी ते आग्रही होते. नांदगावहून सहाय्यक कार्यकारी अभियंता मधुकर साळुंके आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी शनिवारपर्यंत थ्री फेज पुरवठा करू असे आश्वासन दिले. 

Web Title: marathi news local news jalgaon rasta roko electricity circulation