प्रलंबित प्रश्नांसाठी शिक्षक समितीच्या अधिवेशनात सहभागी व्हावे : बोरसे

adhiveshan
adhiveshan

नांदगाव : राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांबाबत समितीच्या माध्यमातून अनेकदा मोर्चे व धरणे आंदोलन करुन संघर्ष केला जातो. या चळवळीचे त्रैवार्षिक अधिवेशन 4 जानेवारी रोजी ओरोस येथे होत असल्याने राज्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील यांनी केले. 

नांदगाव येथे आयोजित जिल्हा पदाधिकारी बैठकीला संबोधित करताना बोरसे बोलत होते. या अधिवेशनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमध्ये मोठा उत्साह असून, जिल्ह्यातील सहा हजार शिक्षक अधिवेशनाला उपस्थित राहणार आहेत. या अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. स्वागताध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष काळुजी बोरसे पाटील राहणार आहेत. प्रमुख अतिथी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

2 जानेवारी रोजी शिक्षक साहित्य संमेलन तर प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या विषयावर 3 जानेवारीला शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील शिक्षणतज्ञ संवाद साधणार आहेत. 

4 जानेवारीला खुले अधिवेशन असून, या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी शिक्षकांना 1 ते 6 जानेवारी या कालावधीतील रजा शासनाने मंजूर केली आहे. या अधिवेशनाच्या निमित्ताने राज्यातील शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, २३ आक्टोबरचा निर्णय रद्द करण्यात यावा, पटसंख्येच्या नावाखाली शाळा बंद करू नये, संगणक परीक्षेस मुदतवाढ देण्यात यावी. तसेच प्रत्येक केंद्र शाळेत डाटा एंट्री ऑपरेटर नेमावा, ऑनलाईन कामासाठी इंटरनेटसह सर्व सुविधा पुरविण्यात याव्यात, सर्व शाळांना मोफत वीज व पाणी मिळावे, सर्व मुलांना गणवेश सरसकट देण्यात यावे, उपस्थिती भत्याच्या रक्कमेत वाढ करावी यासह 30 मागण्या मांडण्यात येणार आहे.

सहविचार बैठकीला पांडुरंग कर्डीले, दादाजी सावंत, केदू देशमाने, सुकदेव पवार, नंदू आव्हाड, संजय शेवाळे, संजय बच्छाव, हेमंत पवार, अनिल धोंडगे, राजेंद्र कदम, भाऊसाहेब मवाळ आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. 

या अधिवेशनाला उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष आनंदा कांदळकर, जिल्हा सरचिटणीस राजेंद्र दिघे, प्रकाश अहिरे, प्रकाश सोनवणे, पी.के. अहिरे, साहेबराव पवार, नितीन देवरे, रविंद्र बोरसे, अनिल बोरसे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com