लोकशाहीचा उत्सवा : अकरापर्यंत 20 टक्‍के मतदान; तासभर उशिराने सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेने लोकशाहीच्या उत्सवाला धिम्यागतीने सुरवात झाली आहे. काही ठिकाणी व्हिव्हिपॅड मशिन सुरू न झाल्याने मतदानास उशिराने सुरवात झाली. सकाळी अकरापर्यंत जळगाव लोकसभेत 17.15 टक्‍के तर रावेर लोकसभा मतदार संघात 20 टक्‍के मतदान झाले आहे. 

जळगाव ः लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज होत आहे. जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या मतदान प्रक्रियेने लोकशाहीच्या उत्सवाला धिम्यागतीने सुरवात झाली आहे. काही ठिकाणी व्हिव्हिपॅड मशिन सुरू न झाल्याने मतदानास उशिराने सुरवात झाली. सकाळी अकरापर्यंत जळगाव लोकसभेत 17.15 टक्‍के तर रावेर लोकसभा मतदार संघात 20 टक्‍के मतदान झाले आहे. 
लोकसभा निवडणुकीचा प्रचार गेल्या महिनाभरापासून सुरू होता. प्रचाराचा धुमधडाका संपल्यानंतर जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारांचे भवितत्व आज (ता.23) मतपेट्यांमध्ये बंद होत आहे. जळगाव लोकसभ मतदार संघातून भाजप- शिवसेना युतीचे उन्मेष पाटील आणि राष्ट्रवादी- कॉंग्रेस आघाडीचे गुलाबराव देवकर यांच्यात खरी लढत पाहण्यास मिळणार आहे. तसेच काहीसे चित्र रावेर लोकसभा मतदार संघात भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार रक्षा खडसे आणि आघाडीचे डॉ. उल्हास पाटील हे भवितत्य मतपेट्यात बंद होणार आहे. 
तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला आज सकाळी सातला सुरवात झाली. पहिल्या दोन तासात जळगाव आणि रावेर लोकसभा मतदार संघात अवघे आठ टक्‍केच मतदान झाले होते. तर अकरा वाजेपर्यंत रावेर संघात 20 आणि जळगावमध्ये 17 टक्‍के मतदान झाले होते. उन्हामुळे काहींनी सकाळी केंद्रावर येवून मतदान केले. मात्र अकरानंतर केंद्रावरील मतदारांची गर्दी काहीशी कमी झाली होती. 
 
तासभर उशिराने सुरवात 
जळगाव जिल्ह्यात 29 ठिकाणी व्हिव्हिपॅड मशिन नादुरुस्त असल्याने एक तास उशिरा मतदान सुरू झाले. 29 व्हिव्हिपॅड, 22 बॅलेट यूनिट बदलल्यानंतर मतदान सुरू झाल्याचे माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिली. 

सखी मतदान केंद्रावर स्वागत 
भारत निवडणुक आयोगाच्या सुचनेनुसार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात एक सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. त्यानुसार जळगाव विधानसभा क्षेत्रात नुतन मराठा महाविद्यालयात सखी केंद्र उभारण्यात आले असून, याठिकाणी मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले. यामुळे मतदारांना देखील एक वेगळा अनुभव या केंद्रावर आला

Web Title: marathi news loksabha election 20 oarsent oting