सुडबुध्दीने कारवाईचा पवारांचा आरोप चूकीचा-माधव भंडारी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

नाशिक- राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरु आहे. त्यांच्याशी भाजपचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, सरकार सुडबुध्दतीने कारवाई करतं असल्याचा शरद पवार व अजित पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते घोटाळ्यातील कारवाई टाळण्यासाठी नव्हे तर सरकारने लोकहिताचे घेतलेले निर्णय भावल्याने भाजपात आल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहास्त्रबुध्दे यांनी सांगितले. 

नाशिक- राज्य सहकारी बॅंकेतील घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये कारवाई सुरु आहे. त्यांच्याशी भाजपचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही, सरकार सुडबुध्दतीने कारवाई करतं असल्याचा शरद पवार व अजित पवार यांचा आरोप चुकीचा असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक नेते घोटाळ्यातील कारवाई टाळण्यासाठी नव्हे तर सरकारने लोकहिताचे घेतलेले निर्णय भावल्याने भाजपात आल्याचे भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार विनय सहास्त्रबुध्दे यांनी सांगितले. 

भाजपच्या मिडिया सेंटरच्या उदघाटना निमित्त खासदार सहस्त्रबुध्दे व व भंडारी नाशिक दौऱ्यावर होते. माध्यमांशी संवाद साधताना ते बोलतं होते. खासदार सहस्त्रबुध्दे म्हणाले, केंद्र व राज्य सरकारच्या लोकहिताच्या निर्णयामुळे भाजपचा जनाधार वाढला आहे. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अस्वस्थ झाल्याने भाजप मध्ये प्रवेश होत आहे. भाजप मध्ये मेगा हि भरती नसून भाजपात येण्यासाठी आमंत्रण दिले गेले नाही कि प्रवेशकर्त्या नेत्यांच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देखील घेतलेली नाही. विरोधी पक्षातील नेत्यांना भाजप मध्ये प्रवेश दिला असला तरी पक्षातील जुन्या नेते,

कार्यकर्त्यांना वंचित ठेवले नाही. जेथे भाजपची ताकद कमी पडते त्याच भागातील नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. राधाकृष्ण विखे- पाटील, विजयसिंह मोहिते- पाटील यांच्या प्रवेशामुळे स्थानिक नेत्यांवर अन्याय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी योनी आश्‍वासनांची पुर्तता केल्याने केंद्रात पुन्हा भाजप सरकार आले यामागे कुठलाही करिष्मा नाही. राज्यातही देवेंद्र फडणवीस यांच्या स्वच्छ व पारदर्शी कारभार असल्याचा दावा खासदार सहस्त्रबुध्दे यांनी केला. 

भाजपवरील आरोप बिनबुडाचे 
राज्य सहकारी बॅंक घोटाळ्या संदर्भात उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे अपेक्षित असताना भाजपवर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचे भाजपचे प्रदेश प्रवक्ते माधव भंडारी यांनी अजित पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर माध्यमांकडे स्पष्टीकरण दिले. उच्च न्यायालयाने जनहित याचिकेवरील सुनावणीत संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिल्यानंतर महिनाभरानंतर कारवाई करण्यात आली. पंरतू या प्रकरणाचे राजकारण केले जात आहे. कारवाईचा आणि भाजपचा काहीएक संबंध नाही. अजित पवार यांचा पत्रकार परिषदेतील खुलासा न्यायालयीन प्रक्रीयेवर अविश्‍वास दाखविणारा आहे. राज्य सरकारने मराठा आरक्षणाचा मुद्दा सकारात्मक पध्दतीने हाताळला. धनगर आरक्षणावर देखील सरकारची सकारात्मक भुमिका आहे. धनगर आरक्षणामुळे आदिवासींच्या आरक्षणावर परिणाम होणार नसल्याचे स्पष्टीकरण श्री. भंडारी यांनी दिले. सरकारच्या योजनांची माहिती यावेळी दिली. 
 

पवार कुटूंबाचा अंतर्गत वाद 
अजित पवार यांचा राजीनामा हा पवार कुटूबांतील अंतर्गत वाद असल्याचे सांगत त्यावर भंडारी यांनी बोलण्यास नकार दिला. पार्थ पवार यांना लोकसभा उमेदवारी जाहीर करण्यात आली त्याचवेळी आलबेल नसल्याचे दिसून आले होते. तो कुटूंबांतील वाद असल्याने त्यावर बोलणे उचित होणार नसल्याचा खुलासा त्यांनी केला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news madhav bhandari