पुरामुळे वाहून गेलेल्या घरांकडे पाहतांना डोळे पानावले

युनूस शेख
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

जुने नाशिकः नदीपात्रास लागून राहणाऱ्या रहिवाशांची घरे पुराच्या पाण्यात पूर्णपणे वाहून गेली. मंगळवारी पाण्याची पातळी कमी झाल्यांवर वाहून गेलेल्या काही घरांचे शिल्लक असलेले अवशेषची जोडणी करतांना रहिवासी दिसून आले. दुसरीकडे ज्याची घरे बचावली,ते घरातील चिखल आणि पाणी उपसा करतांना दिसले. 

   आसराची वेस ते अमरधामपर्यंत नदीपात्रास लागून आलेल्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणावर पुराचे पाणी शिरले. शितळा देवी मंदिरा भागातील तसेच गढीच्या पायथ्याशी असलेले सुमारे 15 घरे वाहून गेले. मंगळवारी पाण्याची पातळी कमी झाल्याने घराचे उरलेले अवशेष दिसून आले. पाणी कमी झाल्याने जे कुटूंबीय सुरक्षीतस्थळी गेले होते. त्यांनी परत आपल्या घराची पहाणी करत उरलेल्या अवशेषची जोडणी करण्याचा प्रयत्न केला. पुरग्रस्त एका घरातील चिमुकले तर दुसऱ्या घरातील वृद्ध दांपत्य तुटलेल्या घराच्या पायथ्याशी बसून निरागस दृष्टीने नदीला निहाळत होते. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mahapur situation