महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे  3 ते 5 जानेवारीदरम्यान प्रेरणा प्रदर्शन 

residentional photo
residentional photo

नाशिक ः महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँन्ड अग्रिकल्चरतर्फे प्रदर्शन महिला उद्योजकांना प्रोत्साहन देणे व त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रेरणा 2020 या सहाव्या प्रदर्शनाचे आयोजन 3 ते 5 जानेवारी दरम्यान सिटी सेंटर मॉलसमोरील लक्षिका मंगल कार्यालय येथे करण्यात आल्याची माहिती राठी सभागृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे उपस्थित होते. 

   महाराष्ट्र चेंबर व्यापार, उद्योग व शेत यांच्या विकासाबरोबरच महिला सबलीकरणाचे व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करीत आहे. 
महाराष्ट्र चेंबरच्या महिला समितीच्यावतीने महिला उद्योजिका तयार करणे व त्यांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांना स्पर्धात्मक बाजारपेठेत स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, उत्तम संधी उपलब्ध करून देऊन त्यांना समाजात मनाचे स्थान निर्माण करून देण्यासाठी विविध कार्यक्रम, सेमिनार, चर्चासत्र, प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून 2012 पासून प्रेरणा प्रदर्शन आयोजित करण्यात येते. गेल्या पाचव्या प्रदर्शनात अतिशय चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रेरणा2020 या सहाव्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सर्व पदार्थ्यांचा समावेश

या प्रदर्शनात वस्त्र, खाद्य पदार्थ, खेळणी, बॅग, घरघुती उपकरणे या नेहमीच्या उत्पादनाव्यतिरिक्त पेपरपासून हाताने बनविलेल्या शोभेच्या वस्तू, ऑरगॅनिक उत्पादने, घाना तेल, ड्रायफ्रूट्‌स, स्वास्थ्य, वजन कमी करणे, संतुलित आहार, ब्रेन मॅपिंग अँन्ड हॅन्ड रायटींग अन्यालीसीस, बॅंकिंग, वैद्यकीय सेवा, वाहन, इन्शुरन्स, यासह विविध प्रकारचे 85 स्टॉल ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहेत. तसेच प्रदर्शनांतर्गत महिलासाठी पैठणी खेळ, अंताक्षरी स्पर्धा, सेल्फ डिफेन्स (निर्भया), पाककृती स्पर्धा - तीळ गूळ पासून बनविलेले पदार्थ अशा स्पर्धा व सेल्फ डिफेन्स, प्रात्यक्षिकांसह आयोजित करण्यात येणार आहेत. मुंबई येथील प्रसिद्ध प्रशिक्षक अंजूषा चौगुले या मार्गदर्शन करणार आहेत. तसेच दररोज आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे. 

सहकुटूंबासह भेट द्यावी

या प्रदर्शनाला सहकुटुंब भेट द्यावी, असे आवाहन चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेच्या, उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे व महिला समितीच्या वतीने करण्यात आले आहे. प्रदर्शनाच्या यशस्वितेसाठी चेंबरचे उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा, महिला उपसमितीच्या चेअरपर्सन सोनल दगडे, दिपा चांगरानी, वृंदा लवाटे, निता वैद्य, सुनंदा सोनवणे, योगिनी देशपांडे, दिपाली बिरारी, वैशाली काळे, डॉ. नेहा वीर आदी प्रयत्नशील आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com