धोरणात्मक निर्णय बाजूलाच,महासभा गुंडाळली 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मे 2019

नाशिक- लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी आज झालेली महासभा गुंडाळण्यात आल्याने त्यावरून वाद निर्माण झाला आहे. काही अधिकारी मेअखेरीस सेवानिवृत्त होत आहे. त्यांच्याशी संबंधित प्रश्‍नांची सरबत्ती होणार असल्याने महासभा तहकुब करण्यात आल्याचा आरोप सभागृह नेते दिनकर पाटील यांनी केला आहे. पाटील यांना शिवसेनेने साथ दिली आहे. 

लोकसभा निवडणुकीची 77 दिवसांची आचारसंहिता संपुष्टात आली. त्यानंतर आज महापौर रंजना भानसी यांनी महासभा बोलावली. या सभेत उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करतं प्रशासनाने मिळकतींना सील ठोकण्याचे प्रकार सुरु केला. त्याबाबत महासभेत जाब विचारला जाणार होता. त्याशिवाय धार्मिक स्थळांबाबतही चर्चा होणार होती. स्मार्ट नगरपरियोजना, शालेय पोषण आहार, शहरातील मोबाईल टॉवरला देण्यात आलेली अनाधिकृत परवानगी आदी महत्वाचे विषय चर्चेला जाणार होते. पण प्रभाग क्रमांक दहा ड च्या पोटनिवडणुकीची आचारसंहिता लागु असल्याने धोरणात्मक निर्णय घेता येत नसल्याचे कारण देत सभा तहकुब करण्यात आली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mahasabha