"महावितरण'च्या अधिकाऱ्याला मारहाण; कार्यालयात तोडफोड जळगाव : वसंतवाडी (ता. जळगाव) येथे वीजपुरवठा सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या वसंतवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरण सबस्टेशनच्या अधिकाऱ्याला मारहाण करीत कार्यालयात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता. 16)

"महावितरण'च्या अधिकाऱ्याला  मारहाण; कार्यालयात तोडफोड   जळगाव : वसंतवाडी (ता. जळगाव) येथे वीजपुरवठा सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या वसंतवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरण सबस्टेशनच्या अधिकाऱ्याला मारहाण करीत कार्यालयात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता. 16)

"महावितरण'च्या अधिकाऱ्याला 
मारहाण; कार्यालयात तोडफोड 

जळगाव : वसंतवाडी (ता. जळगाव) येथे वीजपुरवठा सुरू न झाल्याने संतप्त झालेल्या वसंतवाडी येथील ग्रामस्थांनी महावितरण सबस्टेशनच्या अधिकाऱ्याला मारहाण करीत कार्यालयात तोडफोड केली. ही घटना सोमवारी (ता. 16) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात नऊ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 
शहरातील राजेंद्र रमेश महाजन हे "महावितरण'मध्ये वरिष्ठ यंत्रचालक म्हणून कार्यरत आहेत. ते सद्य:स्थितीत जळके, वसंतवाडी येथील सबस्टेशनवर कार्यरत असून, सोमवारी (ता.16) वीज चोरी प्रतिबंधक कारवाईसाठी सबस्टेशनचे अभियंता अनिल सुलक्षणे, विद्युत सहाय्क विजय साळवे, संदीप गुंजकर, किशोर पवार, वरिष्ठ तंत्रज्ञ अशोक बारी, अमोल भगत, अमोल पाटील, दिनेश पाटील हे वसंतवाडी येथे गेले होते. पुन्हा सबस्टेशनवर परत आल्यानंतर वरिष्ठांच्या निर्देशानुसार अनिल सुलक्षणे केवळ अधिकृत वीज वापरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी ट्रान्स्फॉर्मर (डीपी) सुरू करायला गेले असता वसंतवाडी येथील ग्रामस्थांनी डीपी सुरू करण्यास विरोध करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. 

तोडफोडीनंतर मारहाण 
काही वेळाने सबस्टेशनमध्ये संजय जगराम चव्हाण, दशरथ जगराम चव्हाण, गोपाळ बापू राठोड, नीलेश पंडित चव्हाण, ज्ञानेश्‍वर शिवा चव्हाण, सुपडू मोरसिंग चव्हाण, बसराज गणपत राठोड, विजय सीताराम चव्हाण, विक्रम भिका चव्हाण (सर्व रा. वसंतवाडी तांडा) यांनी तांड्यावरील वीजपुरवठा सुरू करणारे तार काढून सर्व्हिस वायर टाकून इतरांना वीजपुरवठा कसा दिला, असा जाब विचारून शिवीगाळ करत मारहाण करण्याची धमकी देत कार्यालयात प्रवेश केला. तसेच चार खुर्च्यांची तोडफोड करत नुकसान केले. कार्यालयातील फाईल, कागदपत्रे फेकून त्यातील काही फाडून नुकसान केले. याप्रकरणी वरिष्ठ यंत्रचालक राजेंद्र रमेश चव्हाण यांच्या फिर्यादीवरून नऊ जणांविरोधात शासकीय कामात अडथळा यासह शासकीय दस्ताऐवजचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com