मुस्लीम महिलांचा मालेगावात मूक हुंकार

Malegao
Malegao

मालेगाव : ‘हम इस्लाम और इस देश से भी वफादार है, मगर शरियतमें दखल-अंदाजी (हस्तक्षेप) मुस्लीम बर्दाश्‍त नही करेगा’ असे ऑल इंडिया मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डाचे सरचिटणीस मौलाना मोहंमद उमरैन यांनी गुरुवारी येथे सांगितले. मुस्लीम पसर्नल लॉ बोर्डच्या अावाहनानुसार केंद्र सरकारने आणलेल्या तीन तलाक विरोधी कायद्याला विरोध दर्शविण्यासाठी शहरातील मुस्लीम महिलांनी काढलेल्या न भूतो न भविष्यति मूक मोर्चाच्या समारोप व दुवाप्रसंगी ते बोलत होते. मोर्चात 50 हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. 

केंद्र शासनाने शरियतमध्ये हस्तक्षेप सुरु केला, महिलांचा सन्मान व हिताचे त्यांना घेणे-देणे नाही. तीन तलाक विरोधातील कायदा गैर आहे. केंद्राने मुस्लीम समाजातील धर्मगुरु वा विचारवंतांशी चर्चा न करता तीन तलाक विरोधी कायदा आणला आहे. हा कायदा रद्द करावा, शरियतमध्ये मुस्लीम महिलांचा हक्क व अधिकार सुरक्षित आहे. या बरोबरच राष्ट्रपतींनी लाेकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशानात मुस्लिम महिलांबद्दल केलेले व्यक्तव्य गैर. लोकसभेच्या कामकाजातून ते काढून टाकावेत. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या अल्पसंख्यांक समदुायाच्या भावना केंद्राने दुखवू नयेत अशी मागणी निवेदनात करण्यात आली.

शहरातील सर्वधर्मीय व सर्वपक्षीय नेत्यांच्या तहाफुजे ए शरियत कमिटीच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मौलाना उमरैन यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. दुपारी अडीचला एटीटी विद्यालयापासून मोर्चाला सुरवात झाली. रफिया अब्दुल खालीद, ताहेरा रशीद शेख, आयेशा अब्दुल कादीर, अफ्सा आसिफ शेख, शबाना शेख मुफ्तार, सबिना मुजम्मील बफाती, नाजनीन आरीफ हुसेन, शानेहिंद निहाल अहमद, अन्सारी हुमा कौसर, अनिका अब्दुल मलीक, शाकेरा मोहंमद युसूफ, सायराबानो शाहीद अहमद आदी सर्वपक्षीय व सर्वधर्मीय महिलांनी अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रांताधिकारी अजय माेरे यांना निवेदन दिले. 

एटीटी विद्यालय, डॉ.आंबेडकर पुतळा, जुना बसस्थानक, शिवाजी पुतळा, मोसमपुल चौक, कॅम्परोड या मार्गाने महिलांचा मुकमोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. अप्पर जिल्हाधिकारी ते छावणी पोलिस ठाण्यादरम्यान महिला कॅम्प रस्त्यावर बसल्या होत्या. त्यावेळी मोर्चाचे शेवटचे टोक एटीटी हायस्कुलजवळ होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था होती. स्वयंसेवक मार्गावरील रहदारी वळविण्यासाठी वाहतूक पोलिसांना सहाय्य करीत होते. मोर्चा शांततेत पार पडला. मोर्चा समाप्तीनंतर एटीटी विद्यालयाएेवजी कॅम्प रस्त्यावरच दुवा पार पडली.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com