मालेगाव महापौर, उपमहापौर निवडीसाठी १२ डिसेंबरला विशेष महासभा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

मालेगाव-: महानगरपालिकेच्या आठव्या महापौर, उपमहापौर निवडीसाठी १२ डिसेंबरला विशेष महासभा होणार आहे. प्रभारी जिल्हाधिकारी एस. भुवनेश्‍वरी सभेच्या अध्यक्ष तथा निवडणूक निर्णय अधिकारी असतील. विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी बुधवारी (ता.४) सायंकाळी या संदर्भातील आदेश महापालिकेला पाठविला. विद्यमान महापौर रशीद शेख व उपमहापौर सखाराम घोडके यांची मुदत १५ डिसेंबरला संपणार आहे. निवडणूक जाहीर झाल्याने महापौरपदासाठीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत.

महापौरपद ओबीसी महिला राखीव आहे. महापालिकेत त्रिशंकू स्थिती आहे. महापौर पदासाठी कॉंग्रेसतर्फे ताहेरा रशीद शेख, तर महागटबंधन आघाडीतर्फे शानेहिंद निहाल अहमद यांच्या नावाची चर्चा आहे. शानेहिंद यांचे नाव निश्‍चित झाले आहे. कॉंग्रेसने अद्यापही कोणाचे नाव निश्‍चित केलेले नाही. मात्र प्राप्त परिस्थिती पहाता सौ. शेख यांचे नावच आघाडीवर आहे. त्यांनी यापुर्वी अडीच वर्षे महापौरपद भुषविले आहे.

काय सांगता- बोलता बोलता ते तुमचा मोबाईल घेऊन फरार होता

कॉंग्रेस किंवा महागटबंधन आघाडीला १३ सदस्यीय शिवसेनेशिवाय सत्ता काबीज करणे अवघड आहे. यामुळे दोन्ही गटातर्फे शिवसेनेशी संपर्क साधला जात आहे. सद्या महापालिकेत कॉंग्रेस व शिवसेनेची युती आहे. राज्यातही हेच समीकरण कायम झाले आहे. मात्र अद्यापही शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. शिवसेनेला देखील महापौरपदासाठी संधी आहे. मात्र सर्वाधिक २९ सदस्य असलेली कॉंग्रेस या पदावरील दावा सोडेल की नाही या बरोबरच शिवसेनेतर्फे इच्छूक कोण याचीही उत्सुकता आहे.

चर्चा,बैठकींना लगेच सुरवात

येत्या दोन-तीन दिवसात दोन्ही गटांतर्फे नावे निश्‍चिती होताच नगरसेवकांना पर्यटनाला नेण्यात येण्याची शक्यता आहे.
महापौर निवडणुकीसाठी आमदार दादा भुसे, आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल, माजी आमदार आसिफ शेख, विद्यमान महापौर, उपमहापौरांनी मोर्चेबांधणीला सुरवात केली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने आजपासून चर्चा, बैठकांना ऊत येणार आहे.

मालेगाव महापालिकेतील आतापर्यंतचे महापौर
(पै.) निहाल अहमद
आसिफ शेख रशीद
नजमुद्दीन गुलशेर
मलिक युनूस ईसा
ताहेरा रशीद शेख
हाजी मोहंमद इब्राहीम
रशीद शेख (विद्यमान)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news malegaon mayer election