पुण्याच्या धर्तीवर मोफत पार्किंग प्रक्रीया सुरु

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जून 2019

नाशिक- पुण्याच्या धर्तीवर नाशिक शहरातील मॉल मध्येही मोफत पार्किंग सुरु करण्यासाठी संबंधितांना नोटीसा बजावण्याचे आदेश महासभेने दिल्यानंतर त्याची कार्यवाही तातडीने सुरु करण्यात आली आहे. नगररचना विभागामार्फत कारवाईच्या सूचना आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिल्या. 

शहरात चार ते पाच मॉल्स असून नगरचना विभागाकडून मॉल्सला बांधकाम पुर्णत्वाचा दाखला देताना पार्किंगची तरतुद केली आहे कि नाही याची पाहणी केली जाते. पार्किंग मंजूर करतान रस्त्यांवर वाहने लागु नये हा त्यामागचा हेतू आहे परंतू शहरातील मॉल्स मध्ये पार्किंग मध्ये वाहन लावण्यासाठी ठराविक दर आकारले जात असल्याने यावर अनेकदा आंदोलने झाली. गेल्या महिन्यात पुणे महापालिकेच्या शहर सुधार समितीने नुकताचं एक निर्णय घेवून पार्किंग समस्या सोडविण्यासाठी मॉल्स मधील पार्किंग मोफत करण्याचा निर्णय घेतला होता. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेने देखील निर्णय घेण्याची मागणी शिवसेनेच्या नगरसेवक दिपक दातीर व किरण गामणे यांनी केली होती. मंगळवारी झालेल्या महासभेत त्यावर निर्णय घेण्यात आला. पार्किंगवर दर लागु करणाऱ्या मॉल्सला नोटीस बजावण्याचे आदेश महापौरांनी दिले. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news mall parking