मंदीराच्या शहरात पुजाऱ्यांवर भाविकांची नाराजी 

residentional photo
residentional photo

नाशिक  मंदिरांचे शहर अशी ओळख असणाऱ्या नाशिकमध्येच मंदिरांचे व्यवस्थापन आणि पुजाऱ्यांच्या वर्तणुकीविषयी भाविकांमध्ये नाराजी असल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. पुजाऱ्यांची वाढती अरेरावी, भाविकांसोबत केले जाणारे गैरवर्तन, गलथान व्यवस्थापन याबद्दल भाविकांच्या भावना तीव्र आहेत. या बाबी एच. पी. टी. कला आणि आर.वाय. के. विज्ञान महाविद्यालयातील पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले. 

सण आणि उत्सव काळात 41 टक्के भाविक रोज मंदिरात जातात. मात्र पुजाऱ्यांनी मंदिरांचे व्यापारीकरण केल्याचा सूर या सर्वेक्षणातून ऐकावयास मिळाला. गोदा तीरावरील होणाऱ्या पूजविधींमध्ये ही भाविकांच्या पैशांची लूट होते असे, भाविकांना वाटते तर 76 टक्के भाविकांना मंदिरात वाहिलेले नारळ, फुले, प्रसाद असे पूजा साहित्य सत्कारणी लागत नसल्याचे, सर्वेक्षणात आढळून आले आहे. अनेक नवसांनिमित्त देवीच्या मूर्तीवर भाविकांकडून वस्त्र, साड्या वाहिल्या जातात. या दान हे पुनर्विक्रीस ठेवले जाते असे 77 टक्के लोकांना वाटते, तर 62 टक्के भाविकांना मंदिरांना रोख 
देणगीचा गैरवापर होतो, असे वाटते.

  वयोवृद्धांसोबतच मंदिरात जाणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र मंदिरे ही श्रध्दास्थळेच राहावीत त्याठिकाणी सेल्फी पॉईंट असू नयेत असे 97 टक्के तरुणांनी नमूद केले आहे. मात्र वास्तवात मंदिरांमध्ये सेल्फी घेण्याचा 
मोह तरुणांना आवरता येत नाही असे ही या संवादातून जाणवले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com