मंगरूळ येथे विहिरीत आढळला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

पारोळा 12 : मंगरूळ (ता. पारोळा) येथील मयाराम राजाराम पाटील यांच्या शेतातील विहिरीत आज सकाळी बिबट्या आढळला आहे. वनविभागाचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून, बिबट्याला काढण्यासाठी युद्धपातळीवर हालचाली सुरू आहेत. 

बिबट्या विहिरीत नेमका कसा पडला याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहे. ही घटना आज सकाळी नऊच्या सुमारास ग्रामस्थांच्या निदर्शनास आली. डॉ. सुनील पाटील यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एस. दसरे यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. श्री. दसरे वनविभागाच्या ताफ्यासह घटनास्थळी तत्काळ दाखल झाले आहेत. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली आहे. आर. एस. दसरे यांच्या समवेत चाळीसगाव संजय मोरे, एरंडोलचे बी. एस. पाटील, धनंजय पवार (जळगाव) आदींसह वनपाल, वनरक्षक असा सुमारे 50 कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी बिबट्याला काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत.

Web Title: marathi news mangrul bibtya