#BATTLE FOR NASHIK शेंडी तुटो वा पारंबी  आता मागे हटणे नाही- कोकाटे यांचे प्रत्युत्तर 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

नाशिक ः गावोगावचे लोक माझ्यासाठी स्वतःच्या भाकरी बांधून प्रचार करतायत. त्यांच्या भावनांचा आदर करणे माझे कर्तव्य आहे. राजकारणात निगरगट्ट अन्‌ स्वार्थी, फायद्यासाठी कार्यकर्त्यांच्या भावना तुडविणाऱ्यातला मी नाही. आता शेंडी तुटो वा पारंबी तुटो निर्णय झालाय, थांबण्यात अर्थ नाही. पक्षाने काय कारवाई करायची तो त्यांचा अधिकार आहे; परंतु कार्यकर्त्यांचा अनादर मी करणार नाही, असे कडक स्पष्टीकरण नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले ऍड. माणिकराव कोकाटे यांनी दिले. 

शुक्रवारी महायुतीच्या मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्कनेते खासदार संजय राऊत नाशिकमध्ये आले होते. प्रचार कार्यालयाचे उद्‌घाटन व मेळाव्याच्या निमित्ताने राऊत यांनी दोनदा शिवसेनेला अडसर ठरणारे, बंडखोर कोकाटे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. जलसंपदामंत्री गिरीश महाजन चांगले सर्जन असून, त्यांनी बंडखोरी केलेल्या कोकाटे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची मागणी केली. त्याअनुषंगाने कोकाटे यांनी भूमिका मांडली.

 ते म्हणाले, की मी भाजपच्या कुठल्याच पदावर नाही, त्यामुळे माझ्यावर कारवाई करण्यासारखे भाजप नेत्यांकडे काहीच नाही. फार तर सदस्यत्व रद्द करू शकतात, हा त्यांचा अधिकार आहे. माझ्याबाबत काय निर्णय घ्यायचा ते घेतील. पक्ष माझ्यावर कारवाई करत असेल तर त्यांना मी थांबवू शकत नाही. गावोगावचे लोक स्वतःच्या भाकरी बांधून माझ्यासाठी फिरत आहेत. त्यांच्या भावनांचा आदर करणे माझे कर्तव्य आहे. माझ्यासाठी फिरणाऱ्यांना वाऱ्यावर सोडणे माझ्या स्वभावात नाही. राजकारणात मी निगरगट्ट अन्‌ स्वार्थी नाही. आपला फायदा होत असेल तर त्यांच्या भावना तुडविणार नाही. शेंडी तुटो वा पारंबी तुटो निर्णय झाला असून, मागे थांबण्यात अर्थ नाही. पुढे काय व्हायचे ते होईल. लोकांनी मला उभे केलेय, त्यांच्या भावना मी दुखवू शकत नसल्याचे कोकाटे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 
 
इतिहास घडविण्याची तयारी 

येत्या मंगळवारी (ता. 9) डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर ऍड. कोकाटे यांची जाहीर सभा होणार असून, त्याची पूर्वतयारी शहरभर सुरू आहे. मेळाव्याच्या निमित्ताने कोकाटे निवडणूक लढविण्यामागची भूमिका मांडणार आहेत. लोकांच्या मनातील शंकांचे निराकरण करण्याबरोबरच विरोधकांनाही उत्तर देणार आहेत. निवडणुकीतील विकासाचे मुद्दे मेळाव्याच्या निमित्ताने मांडणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले. मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन घडवत डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर इतिहास घडण्याचा दावा केला जात आहे. 

Web Title: marathi news MANIKRAO