# BATTLE FOR DINDORI मांजरपाड्याचे पाणी  मतदारसंघात खेळविणार  धनराज महालेंचा दिंडोरीकरांना शब्द 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 एप्रिल 2019

लखमापूर : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असतानाही आजही मूलभूत पाण्यासारखे प्रश्‍न सुटलेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात मांजरपाड्यासारखा एका चांगल्या प्रकल्पाची झालेली सुरवात केवळ राजकारण म्हणून पूर्ण झालेली नाही. एकीकडे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यासाठी लागेल तितका खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र मांजरपाडा प्रकल्पाचे किरकोळ काम पूर्ण करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे.

लखमापूर : दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पंधरा वर्षांपासून एकहाती सत्ता असतानाही आजही मूलभूत पाण्यासारखे प्रश्‍न सुटलेले नाहीत. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या काळात मांजरपाड्यासारखा एका चांगल्या प्रकल्पाची झालेली सुरवात केवळ राजकारण म्हणून पूर्ण झालेली नाही. एकीकडे महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्यासाठी लागेल तितका खर्च करण्याची सरकारची तयारी आहे. मात्र मांजरपाडा प्रकल्पाचे किरकोळ काम पूर्ण करण्यासाठी सरकार वेळकाढूपणा करत आहे. देशात कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास मांजरपाडा प्रकल्प तत्काळ पूर्ण करून संपूर्ण मतदारसंघाला पाणी देण्यासाठी प्राधान्यक्रमाने काम केले जाईल, असे आश्‍वासन राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार धनराज महाले यांनी खडकमाळेगाव येथील प्रचारसभेत दिले. 

ते म्हणाले, की, दिंडोरी तालुक्‍यातील मांजरपाडा प्रकल्पाचे काम थोडे अपूर्ण आहे. यासाठी सरकार खर्च करू शकत नाही ही खेदाची गोष्ट आहे. मतदारसंघात मांजरपाड्याचे पाणी आल्यास मतदारसंघ सुजलाम्‌ सुफलाम्‌ होईल. आगामी काळात माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जनतेने संधी दिल्यास मी हे काम पूर्ण करेल. वडिलांच्या काळात अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण करण्याचे स्वप्न उराशी बाळगून खासदारकीची निवडणूक आपण सर्वांच्या साक्षीने लढवत आहे. यासाठी आपण मला निवडून द्या, अशी अपेक्षा महाले यांनी व्यक्त केली.

जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे, उमेश डुंबरे, भाऊसाहेब भवर, श्री. लोखंडे, आर. के. शिंदे, वसंत पवार, दत्तू शिंदे, सतीश शिंदे, अनिल सोनवणे, भागीरथ रायते, निवृत्ती पुरकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान मंगळवारी (ता. 9) सकाळी अकराला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहनही या वेळी करण्यात आले. 
 

Web Title: marathi news MANJARPADA