देवसाने-मांजरपाडा वळण योजनेचे सारे श्रेय काँग्रेस आघाडी सरकारचे-छगन भुजबळ

live
live

देवसाने (नाशिक) : देवसाने-मांजरपाडा वळण योजनेचे सारे श्रेय काँग्रेस आघाडी सरकारचे आहे, असे आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले. तसेच गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्राला मिळू शकते याचे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आगामी विधानसभा निवडणुकीचा बिगुल भुजबळांनी वळण योजनेच्या बोगद्यातून वाहणाऱ्या पहिल्या पाण्याचे जलपूजनाने फुंकला. भुजबळांचा जलपूजनाचा कार्यक्रम जाहीर होताच उद्या पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते इथेच जलपूजनाचा कार्यक्रम जाहीर केला. त्यासंबंधाने बोलताना भुजबळांनी स्पष्ट केले की, पालकमंत्र्यांनी जलपूजनसाठी बोलवले असते तर आजचा कार्यक्रम घेण्याची गरज नव्हती. पाण्याचे राजकारण करायचे नाही. सर्व पक्षीय नेते, मुख्यमंत्र्यांनी या योजनेकडे पाहून  गुजरातमध्ये वाहून जाणारे पाणी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळवून द्यावे.

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार धनराज महाले, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी दुष्काळी चांदवड, येवला तालुक्यासह मराठवाड्यात पाणी पोचवण्याचे श्रेय भुजबळांना दिले. दिंडोरी तालुक्यातील जनतेचा त्याग अधोरेखित केला. दिंडोरी तालुक्याला 100 दशलक्ष घनफुट पाणी मिळावे अशी मागणी केली.

भुजबळ म्हणाले, तापी खोऱ्यातील उईके धरणात वाहून जाणारे 101 टीएमसी पाणी महाराष्ट्राला मिळावे. देवसाने वळण योजनेचे पाणी प्रकल्पातील प्रस्तावित 165 कोटींचा प्रस्ताव मार्गी लावत काम सुरू करावे आम्ही पालकमंत्र्यांना हार घालू. आंध्रप्रदेश चे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी 650 मीटर वर पाणी 139 हॉर्सपॉवर पंपाने उचलण्याचा कार्यक्रम राबवला. त्यामुळे आपणही 300 ते 350 मीटर पाणी उचलू शकतो.

येवल्यातील शेतकरी उपस्थित
वळण योजनेतील बोगद्यातील पाण्याच्या जलपूजन सोहळ्यासाठी येवला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. धुक्याची झालर, हजेरी लावणारा वरूनराजा अश्या आल्हाददायक वातावरणाला पेशवाई पथकाचा ढोलांचा दणदणाटचे कोंदण लाभले. बोगद्यातून वाहणारे पाणी पाहून शेतकऱ्यांचे चेहरे फुलून गेले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com