कमी वयामळे अजित लाठर यांचा अर्ज अवैध,24 उमेदवार रिंगणात 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नाशिक ः विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीत आज अजित शांताराम लाठर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला. कॉग्रेस पक्षाकडून लाठर यांनी अर्ज दाखल केला होता.त्यामुळे आता निवडणूक रिंगणात 24 उमेदवार राहिले आहेत. 

विधान परिषदेच्या निवडणूकीसाठी उमेदवाराचे वय 30 वर्षे असावे. अशी अट आहे. श्री लाठर यांचे 28 वय असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. नाशिक रोडला विभागीय आयुक्तांच्या कक्षात सकाळी अकराला उमेदवारी अर्जाची छाननी झाली. येत्या 11 जूनपर्यत उमेदवारी अर्ज माघारी चालणार असून आजपासूनच माघारी अर्जाची स्विकृती सुरु झाली आहे. निवडणूक

रिंगणात राहिलेले उमेदवार असे ः 
अनिकेत विजय पाटील (भाजप), सुनिल रमेश बच्छाव (अपक्ष), सुरेश पांडूरंग पाटील (हिंदुस्थान जनता पार्टी), अजितराव किसन दिवटे, अमृत उर्फ आप्पासाहेब रामराव शिंदे, अशोक शंकर पाटील, गजानन काशीराम खराटे, किशोर भिकाजी दराडे, कुणाल नरेंद्र दराडे, दिनेश अभिमन्यू देवरे, रविंद्र भिवाजी पटेकर, विलास शांताराम पाटील, विठ्ठल रघुनाथ पानसरे, सुनील पांडुरंग पंडीत, प्रताप नारायणराव सोनवणे, सुनील धोंडू फरस, बाळासाहेब संभाजी गांगर्डे, संदीप त्र्यंबकराव बेडसे, भाउसाहेब नारायण कचरे, शालीग्राम ज्ञानदेव भिरूड, महादेव साहेबराव चव्हाण, महेश भिका शिरुडे, शेख मुक्तार अहमद कासीम, प्रकाश हिला सोनवणे 

Web Title: marathi news manodharya model state