#MarathiKrantiMorcha मनमाडला रेल रोको करण्याचा प्रयत्न,जोरदार घोषणाबाजी,बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जुलै 2018

 मनमाड(नाशिक) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला., कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे., सुमारे दीड तास मनमाड-येवला महामार्ग रोखून धरत रास्तारोको केला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.. दोन आंदोलकांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला जाळण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले., काही आंदोलकांनी हातात ध्वज घेत रेल्वेस्थानकात घुसून जोरदार घोषणाबाजी केली.

 मनमाड(नाशिक) : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे पुकारण्यात आलेल्या मनमाड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला., कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी मनमाड शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात येत आहे., सुमारे दीड तास मनमाड-येवला महामार्ग रोखून धरत रास्तारोको केला. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.. दोन आंदोलकांनी बीएसएनएलच्या टॉवरवर चढून आंदोलन केले. यावेळी मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळला जाळण्यात आला. त्यानंतर तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले., काही आंदोलकांनी हातात ध्वज घेत रेल्वेस्थानकात घुसून जोरदार घोषणाबाजी केली. एवढ्यावरच न थांबता त्यांनी  रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. सरकार विरोधी घोषणाबाजी करत आपला निषेध नोंदवला. मनमाड बस आगारातील एस टी बस फेऱ्या बंद करण्यात आल्या., तसेच सुरक्षेचा उपाय म्हणून  बस स्थानकावर शुकशुकाट, पोलिसांचा चोख बंदोबस्त..

Web Title: marathi news maratha andolaan at manmad