भुसावळ : सानिया कादरी यांच्या घरावर संतप्त शेतकऱ्यांचा हल्ला 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 सप्टेंबर 2017

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार) हल्ला करुन घरातील वस्तूंची तोडफोड केली. यात सुरक्षा रक्षकासह चारजण जखमी झाले. 

भुसावळ : येथील बांधकाम व्यवसायिक म्हणून परिचित असलेल्या सानिया कादरी यांच्या घरावर एैनपूर येथील संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवार) हल्ला करुन घरातील वस्तूंची तोडफोड केली. यात सुरक्षा रक्षकासह चारजण जखमी झाले. 

सानिया कादरी हे व्यक्तीमत्व गेल्या काही वर्षा पासून सतत चर्चेत असते. माजी आमदार संतोष चौधरी यांच्याशी खंडणी प्रकरणातील वाद, माजी नगराध्यक्ष अख्तर पिंजारी यांच्या मुलावर पिस्तुलातुन झाडलेल्या गोळ्या, घरापुढील बांधकाम पालिकेने पाडल्याचे प्रकरण, निवडणुक प्रचारातील सहभाग आदी विविध कारणांनी कादरी या कायम चर्चेत राहिल्या आहेत. भुसावळची लेडी डॉन म्हणूनही त्यांचा उल्लेख केला जातो.

मध्यंतरीचा काळ शांततेत गेल्या नंतर गेल्या काही दिवसात पुन्हा त्या चर्चेत आल्या त्या शेतकऱ्यांचे केळीचे पैसे न दिल्याच्या प्रकरणात. रावेर तालुक्‍यातील ऐनपूर, बलवाडी, तांदलवाडी, खिर्डी, यावल तालुक्‍यातील अट्रावल तसेच मुक्ताईनगर येथील सुमारे 70 शेतकऱ्यांची केळी कादरी यांनी खरेदी केली. त्यानंतर दुसऱ्या व्यापाराला विकली. मात्र सुरवातीला काही रक्कम मिळाली नंतर वारंवार मागणी करुनही न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला. ही रक्कम दोन कोटी पेक्षाही जास्त असल्याचे सांगितले जाते.

आज या शेतकऱ्यांनी विविध वाहनातून येऊन सरळ भुसावळ गाठले. कादरी यांच्या जामनेर रोडवरील "कृष्णकुंज' या घरा समोर जमून सरळ ते घरात घुसले. घरातील फर्निचरसह विविध सामानाची त्यांनी तोडफोड केली. शिवाय खिडकीच्या काचाही फोडल्या. या हल्यात सुरक्षा रक्षक धीरज ठाकूर व इतर तीन नोकर जखमी झाले. यावेळी कादरी व त्यांचे नातेवाईक घरात होते मात्र त्यांना कोणतीही इजा झाली नाही. घटनेचे वृत्त कळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक निलोत्पल, पोलिस निरीक्षक चंद्रकांत सरोदे पोलिस पथकासह दाखल झाले. त्यांनी सुमारे 14 महिला व पुरुष शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. इतर शेतकरी पोलिस येण्याची चाहुल लागताच तेथून निघून गेले.

Web Title: Marathi news Marathi latest news Sania Kadari Bhusawal